Short News

सेबीकडून आयडीबीआय बँकेची मुंबईतील मालमत्ता खरेदी

सेबीकडून आयडीबीआय बँकेची मुंबईतील मालमत्ता खरेदी

सेबीने भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक मालमत्तेचे अधिग्रहण आहे. आयडीबीआय बँकेची बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील सात मजली कार्यालयाची इमारत सेबीने खरेदी करण्याचा करार केला आहे. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबईतील मुख्य व्यवसायाचे केंद्र मानले जाते. सेबी आणि आयडीबीआय बँकेदरम्यान झालेल्या करारानुसार, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या संचालक मंडळाने अलीकडेच या खरेदीला मंजुरी दिली आहे.
ईडी जप्त करणार मल्या, मोदी आणि चोक्सीची संपत्ती

ईडी जप्त करणार मल्या, मोदी आणि चोक्सीची संपत्ती

फरार आर्थिक घोटाळेबाज विजय मल्या, नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी या तिघांवर अंमलबजावणी संचालनालय मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. ईडीने या आरोपींची 15 हजार कोटींची संपत्ती जप्त करण्याची तयारी सुरु केली आहे. यानुसार पहिली कारवाई लंडनला पळून गेलेला मद्य व्यापारी विजय मल्यावर होणार आहे. त्यानंतर नीरव मोदी, मेहुल चोक्सी, जतिन मेहता यांच्यावरही संपत्ती जप्तीची कारवाई होणार आहे.
आज रेडमी नोट 5 खरेदी करण्याची सुवर्णसंधी

आज रेडमी नोट 5 खरेदी करण्याची सुवर्णसंधी

शाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 5 खरेदी करण्याची आज चांगली संधी आहे. हा स्मार्टफोन विक्रीसाठी 24 तास उपलब्ध राहणार आहे. आतापर्यंत या फोनची विक्री फ्लॅश सेलमध्ये केली जात होती, मात्र संपूर्ण दिवसभर हा फोन खरेदी करण्याची संधी आहे. रेडमी नोट 5ची विक्री केवळ Mi.com या कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटवर केली जाईल. कंपनीने ट्विटरवरुन याची माहिती दिली. रात्री 12वाजेपासून रेडमी नोट5 विक्रीसाठी उपलब्ध होईल. 
विश्वचषक जिंकणे माझे स्वप्न नाही- एबी डिवीलिअर्स

विश्वचषक जिंकणे माझे स्वप्न नाही- एबी डिवीलिअर्स

2019 चा विश्वचषक जस जसा जवळ येत आहे तसे अनेक खेळाडूंची विधाने समोर येत आहेत. त्यातच दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिवीलिअर्सने माध्यामांशी बोलताना मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे अनेकांना धक्काच बसला आहे. 2019 चा विश्वचषक जिंकणे हे माझे अंतिम स्वप्न नसल्याचे एबी डिवीलिअर्स म्हणाला. आपले विचार बदलले असून आपण एकावेळी एकाच स्पर्धेचा विचार करत असल्याचेही तो म्हणाला.