Short News

15 एप्रिल 2018 : मुंबईत पेट्रोल 4 तर डिझेल 8 पैशांनी महाग

15 एप्रिल 2018 : मुंबईत पेट्रोल 4 तर डिझेल 8 पैशांनी महाग

आज मुंबई आणि दिल्लीच्या बाजारात इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. मुंबईत पेट्रोल 4 पैशांनी महागले आहे. तर डिझेलच्या दरात तब्बल 8 पैशांची वाढ झाली आहे. शहरात पेट्रोल प्रतिलिटर 81.83 रु.आणि डिझेल प्रतिलिटर 69.31 रुपये आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल 5पैशांनी तर डिझेल 8पैशांनी महागले आहे. दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर 73.98रु. तर डिझेल 65.09 रु.प्रतिलिटर आहे.
रेल्वे क्रॉसिंगवर स्कूल व्हॅनला उडवले, चालकासह 11 विद्यार्थ्यांचा मृत्यू

रेल्वे क्रॉसिंगवर स्कूल व्हॅनला उडवले, चालकासह 11 विद्यार्थ्यांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे. रेल्वे क्रॉसिंगवर स्कूल व्हॅनला ट्रेनने धडक दिली, ज्यामध्ये चालकासह 11 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. कुशीनगरच्या डिव्हाईन मिशन स्कूलचे विद्यार्थी ज्या स्कूल बसमधून जात होते, ती मानवरहित रेल्वे क्रॉसिंग पार करत होती. यावेळी वेगाने आलेल्या पॅसेंजर ट्रेनने स्कूल व्हॅनला उडवले.पोलीस आणि प्रशासनाने माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.
प्रियंकाला प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलच्या लग्नाचे आमंत्रण

प्रियंकाला प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलच्या लग्नाचे आमंत्रण

प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलच्या लग्नाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. लंडनमध्ये 19मे रोजी ते दोघे लग्नाच्या गाठीत अडकणार आहेत. या लग्नाचे आमंत्रण बॉलिवूडमधील देखील एका अभिनेत्रीला आले आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून देसी गर्ल प्रियांका चोप्रा आहे.19 मे रोजी होणाऱ्या लग्नाच्या पाहुण्याच्या यादीत प्रियांकाचे नावदेखील सामील आहे. प्रियांका हॉलिवूड अभिनेत्री मेगनची खूप चांगली मैत्रिण आहे. 
पाकिस्तानात लग्नाला नकार दिल्याने मुलीची हत्या

पाकिस्तानात लग्नाला नकार दिल्याने मुलीची हत्या

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात ऑनर किलिंगची घटना घडली आहे. 26 वर्षीय एका इटालियन-पाकिस्तानी मुलीची तिच्या घरच्यांनी हत्या केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नातेवाईकासोबत लग्न करण्यास नकार दिल्याने मुलीचा खून करण्य़ात आला. सना चीमा असे या खून झालेल्या मुलीचे नाव आहे. विशेष म्हणजे पूर्ण परिवाराने अपघात झाल्याची बतावणी केली होती.