Short News

सरकारच्या 'या' निर्णयामुळे डुकाटीपासून हार्लेपर्यंत स्वस्त झाल्या बाईक

सरकारच्या 'या' निर्णयामुळे डुकाटीपासून हार्लेपर्यंत स्वस्त झाल्या बाईक

बाईक प्रेमींसाठी अंत्यत महत्त्वाची बातमी आहे. सरकारच्या निर्णायामुळे बाईकप्रेमींना गिफ्ट दिले आहे. केंद्र सरकराने महागड्या विदेशी बाईकवरील आयात क्षुल्क कमी करत ५० टक्के केले आहे. याआधी मागवण्यात आलेल्या दुचाकी ज्याचे इंजिन ८०० सीसीपेक्षा कमी आहे. अशा गाड्यावर ६० टक्के कस्टम ड्युटी लावली जात होती. आता ८०० सीसी पेक्षा जास्त इंजिन असलेल्या दुचाक्यांवर ७५ टक्के कस्टम ड्युटी लावली जात होती. 
अखेर पिएनबी घोटाळ्यावर मोदींनी मौन सोडले

अखेर पिएनबी घोटाळ्यावर मोदींनी मौन सोडले

जनतेच्या पैशाची लूट सरकार कदापि सहन करणार नाही. आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेत केलेल्या ११,४०० कोटींच्या घोटाळ्यांबाबत आपले मौन सोडले आहे. नवी दिल्लीत आयोजित ग्लोबल बिझनेस समिटमध्ये ते बोलत होते.
‘मणिकर्णिका’मधील कंगना रणौतचा  दुसरा लूक व्हायरल

‘मणिकर्णिका’मधील कंगना रणौतचा दुसरा लूक व्हायरल

सध्या कंगना रणौतच्या मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी सिनेमाची सर्वाधिक चर्चा आहे. सध्या राजस्थानमधील बिकानेर येथे या सिनेमाचे चित्रीकरण सुरू आहे. सिनेमाच्या सेटवरील काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात कंगनाच्या लूकचीच सर्वात जास्त चर्चा होताना दिसत आहे. या फोटोमध्ये कंगनाने लाल रंगाची साडी नेसली आहे. साडीच्या काठपदरापासून ते दागिन्यांपर्यंत तिचा रॉयल लूक समोर येत आहे.
उबेर, टेस्लाचे प्रमुखांचे ट्विटर वॉर, उबर आणणार हवाई टॅक्सी

उबेर, टेस्लाचे प्रमुखांचे ट्विटर वॉर, उबर आणणार हवाई टॅक्सी

उस्मानी टॅक्सिस विरूस हायपरलोप वाहतूक व्यवस्थेच्या विरोधात युद्ध सुरू झाले यानंतर उबेरचे सीईओ दारा खोसरोहीही आणि टेस्लाचे सीईओ एलोन मस्क हे मायक्रो-ब्लॉगिंग साईट ट्विटरवर उघडले. त्याच्या पुढील-जनरल गतिशीलता स्वप्नसाठी tunnels राईड हॅलिंग अॅप्लिकेशन उबेर यांनी २०२०पर्यंत लॉस एन्जेलिसमधील आपल्या महत्वाकांक्षी टॅक्सी प्रोजेक्टची सुरूवात करणार असल्याची घोषणा केली आहे.