Short News

उन्हाळ्यात लुटा हवाई प्रवासाचा आनंद; प्रवास भाड्यात 9 टक्क्यांनी घसरण

उन्हाळ्यात लुटा हवाई प्रवासाचा आनंद; प्रवास भाड्यात 9 टक्क्यांनी घसरण

विमान प्रवासाचा विचार मनात असेल, तर पटकन निर्णय घ्या. यंदा उन्हाळ्यात देशांतर्गत विमान प्रवास 4 ते 9 टक्क्यांनी स्वस्त झाला आहे. ट्रॅव्हल अ‍ॅग्रीगेटर संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार हवाई तिकिटांच्या मागणीत 20 टक्के वाढ झाली आहे. तरीही भाड्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत घसरण झाली आहे. हवाई प्रवास भाड्यात गेल्या वर्षीच्या या काळाच्या तुलनेत 5 टक्के घसरण झाली आहे.
महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावरुन सुरमई, पापलेट झाले गायब

महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावरुन सुरमई, पापलेट झाले गायब

सुरमई फ्राय, बोंबलाचं तिखलं, भरलेला पापलेट, आता हे सगळे विसरा. कारण मुंबईकरांसह कोकणावासियांचे अन्नातील प्रमुख घटक असलेले विविध मासे महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावरुन गायब झाले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून माशांनी महाराष्ट्राचा किनारा सोडला आहे. महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर गोवा, गुजरात, केरळ आणि कर्नाटकातल्या महाकाय बोटी येऊन मासेमारी करत आहेत. त्याचा थेट परिणाम माशांच्या प्रजननावर होत आहे. 
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 166,  तर निफ्टीत 30 अंकांची वाढ

शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 166, तर निफ्टीत 30 अंकांची वाढ

शेअर बाजाराच्या दुसऱ्या दिवशी तेजी दिसली. मंगळवारी सेन्सेक्स 165.87 अंकांनी वाढच 34,616.64 स्तरावर पोहोचला. तर निफ्टी 29.65 अंकांनी वाढला असून यात 10,614.35 अंकांवर निफ्टी बंद झाला. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्समध्ये चांगली वृद्धी दिसली. बँकिंग सेक्टर मध्ये शेअर्स तेजी दिसली. तर यसबँक आणि आयसीआयसीआय बँकच्या शेअर्समध्ये वाढ दिसत आहे.
ट्रम्प यांचा झटका ! एच 1बी व्हिसाधारकाच्या जोडीदाराच्या नोकरीवर गदा ?

ट्रम्प यांचा झटका ! एच 1बी व्हिसाधारकाच्या जोडीदाराच्या नोकरीवर गदा ?

अमेरिकेतील एच 1बी व्हिसाधारकांना ट्रम्प प्रशासनाने आणखी एक धक्का देण्याची तयारी केली आहे. एच1बी व्हिसाधारक व्यक्तीच्या जोडीदाराला यापुढे अमेरिकेत नोकरी करता येणार नाही, असा नवीन नियम ट्रम्प प्रशासन करणार आहे. या निर्णयाचा फटका अमेरिकेत राहणाऱ्या हजारो भारतीय आणि त्यांच्या कुटुंबांना बसणार आहे. बराक ओबामा यांच्या कार्यकाळात एच १बी व्हिसावर संबंधित व्यक्तीच्या जोडीदारालाही नोकरीची संधी होती.