Short News

अॅक्सिस बँक सुरू करणार व्हॉट्सअॅप पेमेंट

अॅक्सिस बँक सुरू करणार व्हॉट्सअॅप पेमेंट

अॅक्सिस बँक आपल्या ग्राहकांसाठी व्हॉट्सअॅप सेवा देणार असून या अॅपद्वारे ग्राहक व्यवहार करू शकणार आहेत. देशातील तिसरी सर्वात मोठी बँक लवकरच युनिफाईड पेमेंट इंटरफेसने ही सेवा सुरू करणार आहे. पुढील दोन महिन्यात पूर्ण देशभरात ही सेवा सुरू होणार आहे. 66 टक्के व्यवहार हे डिजिटल पद्धतीने करण्याचे धेय्य असल्याचे बँकेचे कार्यकारी अधिकारी राजीव आनंद म्हणाले. 
गृहिणींसाठी धक्कादायक बातमी,  घरगुती गॅसची किंमत वाढण्याची शक्यता

गृहिणींसाठी धक्कादायक बातमी, घरगुती गॅसची किंमत वाढण्याची शक्यता

सरकार घरगुती गॅसच्या किंमती वाढवण्याची शक्यता आहे. यामुळे महिला वर्गाला मोठी काटकसर करावी लागणार आहे. वाढ करण्यात येणारे दर हे दोन वर्षातील सर्वाधिक दर असणार आहेत. यामुळे सीएनजी, विज आणि यूरिया उत्पादनाची किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक गॅसची किंमत ही 1 एप्रिलपासून 3.06 प्रति डॉलर मिलियन ब्रिटिश थर्मल यूनिट होणार आहे. सध्या ही किंमत 2.89 डॉलर आहे. 
NYIFF 2018मध्ये ‘न्यूड’ला ओपनिंग फिल्मचा सन्मान

NYIFF 2018मध्ये ‘न्यूड’ला ओपनिंग फिल्मचा सन्मान

दिग्दर्शक रवि जाधव यांच्या ‘न्यूड' चित्रपटाला न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ओपनिंग चित्रपटाचा सन्मान मिळाला आहे. ही माहिती रवि जाधव यांनी फेसबुकच्या माध्यमातून दिली. या महोत्सवात ओपनिंग चित्रपटाचा मान मिळवणारा न्यूड हा पहिला मराठी चित्रपट ठरल्याचंही त्यांनी म्हटलं. ‘इंडो अमेरिकन आर्ट काऊन्सिल'चा न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल ७ मे ते १२ मे या कालावधीत पार पडणार आहे.
लेस्बियन खेळाडून आपल्या गर्लफ्रेंडला केलं प्रपोज

लेस्बियन खेळाडून आपल्या गर्लफ्रेंडला केलं प्रपोज

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट टीमची तेजतर्रार बॉलर मॅगन शूटनं आपल्या गर्लफ्रेंड होल्यॉकसोबत विवाह करणार असल्याचं जाहीर केलंय. आपल्या यशाचं सेलिब्रेशन करण्यासाठी शूटनं आपल्या पार्टनरसोबत एक फोटोही ट्विटरवरून शेअर केलाय. 'मला माझ्या आयुष्यासाठी याहून अधिक चांगला पार्टनर मिळू शकत नाही' असं म्हणत जेसिकानं आपला एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केलाय.