Short News

BSNL चा धमाका ऑफर;  ९९९ रुपयात ६ महिने डेटा, कॉलिग फ्रि

BSNL चा धमाका ऑफर; ९९९ रुपयात ६ महिने डेटा, कॉलिग फ्रि

बीएसएनएल कंपनीने ग्राहकांसाठी आकर्षक प्लान आणाला आहे. प्रीपेड युजर्ससाठी आणलेला हा प्लान याचे नाव 'मॅक्सिमम ९९९' असे आहे. बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना हा प्लान सहा महिन्याच्या वैध्यतेबरोबर अनलिमिटेड डेटा आणि कॉलिगची ऑफर दिली आहे. या प्लानची किंमत बीएसएनएलने ९९९ रुपये ठेवले आहे. ग्राहकांना यात १ जीबी अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. दररोज १ जीबी इंटरनेट सेवा मिळणार आहे. 
विरानुष्काच्या 'त्या' फोटोला एका तासात मिळाल्या लाखो लाईक्स

विरानुष्काच्या 'त्या' फोटोला एका तासात मिळाल्या लाखो लाईक्स

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माचा एका फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोला तासाभरात १३ लाख लाईक्स मिळाले आहेत. विराट कोहलीने हा फोटो शेअर केला आहे. याशिवाय २५ हजार लोकांनी या फोटोवर कमेंट केली आहे. हा फोटो एक प्रेमी आणि प्रेमिका एकमेकांना घट्ट अलिंगनाचा देत असल्याच्या फोटोसमोर काढण्यात आला आहे. 
ही टेलिकॉम कंपनी होणार बंद

ही टेलिकॉम कंपनी होणार बंद

टेलिकॉम कंपनी एअरसेल दिवाळखोरीच्या स्थितीमध्ये आली आहे. कंपनीनं नॅशनल कंपनी ट्रिब्यूनलकडे दिवाळखोरीसाठी अर्जही दाखल केला आहे. एअरसेल कंपनी बंद झाल्यावर त्यांच्या सगळ्या सर्कलच्या सेवाही बंद होणार आहेत. दिवाळखोरीचा अर्ज देण्याआधीच कंपनीनं त्यांच्या बोर्डला रद्द केलं आहे. दिवाळखोर घोषित झाल्यावर एअरसेल कंपनी म्हणून संपुष्टात येईल.
अझलन शहा हॉकी स्पर्धेत सरदार सिंहचे पुनरागमन

अझलन शहा हॉकी स्पर्धेत सरदार सिंहचे पुनरागमन

हॉकी इंडियाने २७ व्या सुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेसाठी १८ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. ३ मार्चपासून मलेशियाच्या इपोह शहरात ही स्पर्धा होणार आहे. भारतासह या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, इंग्लंड, आयर्लंड आणि यजमान मलेशिया हे संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी सरदार सिंहच्या हाती संघाचं नेतृत्व सोपवले.