युको बँकेत 621 कोटींचा घोटाळा; 10 ठिकाणी सीबीआयचे छापे
व्यापार
- 10 days ago
सीबीआयने युको बँकेचे माजी सीएमडी अरुण कौल आणि इतरांविरोधात 621 कोटी रुपयांच्या कथित कर्ज फसवणूकप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या फसवणुकीमुळे बँकेचे 737.88 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तपास संस्थेने यासंबंधी शनिवारी 10 जागी छापे मारले. यातील 8 छापे दिल्लीत, तर 2 छापे मुंबईत मारण्यात आले. आरोपींनी फसवणुकीच्या उद्देशाने कर्जात हेराफेरी करून युको बँकेला सुमारे 621 कोटी रुपयांचा धोका दिला.