Short News

आयफोन चाहत्यांसाठी खूशखबर , फ्लिपकार्टवर आयफोन बंपर ऑफर

आयफोन चाहत्यांसाठी खूशखबर , फ्लिपकार्टवर आयफोन बंपर ऑफर

आयफोन चाहत्यांसाठी अॅपलने एक खास ऑफर आणली आहे. फ्लिपकार्टने अॅपलच्या सर्व आयफोनवर बंपर डिस्काउंट दिले आहे. या सेलमध्ये आयफोन x पासून ते आयफोन SE पर्यंत सर्व स्मार्टफोनवर मोठी सूट देण्यात आली आहे. डिस्काउंटसोबतच आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड यूजर्सला अतिरिक्त सूट मिळणार आहे. तसेच ईएमआय आणि कॅशबॅक ऑफरही देण्यात आली असून ही ऑफर हा १५ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. 
हायपरलूपने मुंबई पुण्याचे अंतर होणार कमी

हायपरलूपने मुंबई पुण्याचे अंतर होणार कमी

जगातील पहिली हायपरलूप मुंबई ते पुणेदरम्यान धावणार आहे. तसे झाल्यास दोन्ही शहरांतील १५० किमीचे अंतर फक्त १४ ते २५ मिनिटांत कापले जाणार आहे. सध्या हे अंतर गाठण्यासाठी तीन तास लागतात. रविवारी व्हर्जिन ग्रुप आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने मुंबई-पुणे हायपरलूप ट्रान्सपोर्टेशन सिस्टिमला जोडण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. 
‘माझ्या बायकोचा प्रियकर’चा टीझर प्रदर्शित

‘माझ्या बायकोचा प्रियकर’चा टीझर प्रदर्शित

अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव आणि भाग्यश्री मोटे यांची मुख्य भूमिका असलेला माझ्या बायकोचा प्रियकर सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या टीझरमध्ये तीनही व्यक्तिरेखांची छोटीशी झलक दाखवण्यात आली आहे. राजीव एस रूईया दिग्दर्शित आणि राजकला मूवीज व बाबा मोशन पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.
बॉलीवूडमध्ये स्टार होण्यासाठी अभिनय अभिनय येणं गरजेचे नाही

बॉलीवूडमध्ये स्टार होण्यासाठी अभिनय अभिनय येणं गरजेचे नाही

इरफान खान एक उत्तम अभिनेता आहे,हे आपल्याला माहितच आहे. त्याने आपल्या अभिनयचा ठसा हॉलिवूडमध्येही उमटवला आहे. परंतु इरफान खानच्या मते स्टार होण्यासाठी अभिनय यावा हे महत्त्वाचे नाही. आपल्या भल्या मोठ्या अनुभवानंतर इरफान खान म्हणतोय की, बॉलीवूडमध्ये चित्रपटांमध्ये अनेकदा अभिनयाची गरजच पडत नाही. उत्तम अभिनय येऊनही तुम्ही 'स्टार' होत नसल्याचे तो म्हणाला.