Short News

फूडपांडाची ४०० कोटींची गुंतवणूक, कंपनी करणार २५ हजार कर्मचाऱ्यांची भर्ती

फूडपांडाची ४०० कोटींची गुंतवणूक, कंपनी करणार २५ हजार कर्मचाऱ्यांची भर्ती

फूड प्रॉडक्ट्स ऑनलाईन कंपनी ऑर्डर आणि डिलिव्हरी करणारी फूडपांडा इंडिया मोठी गुंतवणूक करणार आहे. साधरणपणे ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक ही कंपनी करणार आहे. यातून कंपनी देशभरात आपली डिलीव्हरी नेटवर्क मजबूत करणार आहे. याबरोबर फूडपांडामध्ये टेक्नोलॉजी वाढविण्यात येणार आहे. कंपनी एका वर्षात साधारण प्रॉडक्ट डिलीव्हरीसाठी २५ हजार कर्मचाऱ्यांची भर्ती करणार आहे.
'खली बली' आता 'गंगनम' स्टाइलमध्ये

'खली बली' आता 'गंगनम' स्टाइलमध्ये

पद्मावत' चित्रपटातील 'खली बली' हे गाणंही असंच सोशल मीडियावर नवनवीन वर्जन्ससह हिट ठरतंय. रणवीर सिंगवर चित्रित केल्या गेलेल्या या गाण्यात त्याने अप्रतिम ऊर्जा दाखविल्यानं हे मूळ गाणं प्रेक्षकांना चांगलंच भावलं. आता या गाण्याच्या वर्जन्सनींही प्रेक्षकांना भुरळ घातलीय. सोशल मीडियावर 'खली बली'च्या नवनवीन वर्जन्समध्ये सर्वाधिक हिट ठरतंय ते त्याचं 'गंगनम' स्टाइल वर्जन.
जर्मनीत गुंजली कुछ कुछ होता है ची धून

जर्मनीत गुंजली कुछ कुछ होता है ची धून

द स्टटरागार्ट चेंबर या जर्मन ऑर्केस्ट्राने (वाद्यवृंदाने) ‘तुम पास आए... यू मुस्कुराए' या गाण्यावर सुंदर सादरीकरण करत प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काच दिला. या गाण्याची धुन अनोख्या आणि तितक्याच प्रभावी पद्धतीने सादर करणाऱ्या या वाद्यवृंदाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही फारच कमी वेळात व्हायरल झाला आणि करण जोहरपर्यंतही पोहोचला.
आशिक बनाया आपने गाण्यावरील या मुलीचा डान्स पहाच...
<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/gepf8kjRXgA" frameborder="0" allow="autoplay; encrypted-media" allowfullscreen></iframe>

आशिक बनाया आपने गाण्यावरील या मुलीचा डान्स पहाच...

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रोतेला आणि करण वाहीच्या हेट स्टोरी 4 चे ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. अलिकडेच त्याचे पहिले गाणे आशिक बनाया आपने देखील प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. आता या गाण्यावर डान्स करतानाचा एका मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा तरूणाईला चांगलाच भावला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. सोनाली असे या मुलीचे नाव आहे.