अक्षय्य तृतीया महागली! सोन्याचा भाव 32 हजारांवर
व्यापार
- 5 days ago
अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. बहुतेक जण अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत सोने खरेदी करतात. पण सोन्याच्या भावाने 32 हजारांचा विक्रमी टप्पा ओलांडल्याने अनेकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियात तणाव निर्माण झाल्याने त्याचा परिणाम सोन्या-चांदीवर दिसून आला. अहमदाबादमध्ये सोन्याचा भाव तोळ्याला 32,300 रुपयांवर गेला. तर चांदीचा भावही 40हजार रुपये किलोवर गेला आहे.