Short News

सरकार एअर इंडियाचा  ‘आयपीओ’ काढण्याच्या विचाराधीन

सरकार एअर इंडियाचा ‘आयपीओ’ काढण्याच्या विचाराधीन

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एअर इंडियातील आपली 76 टक्के हिस्सेदारी विकण्याचा सरकारचा प्रयत्न फसला आहे. आता या कंपनीला शेअर बाजारात सूचीबद्ध करून प्राथमिक सार्वजनिक प्रस्ताव (आयपीओ) विक्रीला ठेवण्याच्या प्रस्तावावर केंद्र सरकार विचार करीत आहे. आयपीओ आणल्यास दोन गोष्टी साध्य होतील. एअर इंडियाची मालकी सरकारकडेच राहील, तसेच कंपनी चालविण्यासाठी निधीही उपलब्ध होऊ शकेल. 
टीव्हीचा आवाज वाढवला म्हणून  भाच्याला दिले

टीव्हीचा आवाज वाढवला म्हणून भाच्याला दिले

टीव्हीचा आवाज वाढवला म्हणून भाच्याला सरोट्याने अंगावर चटके दिल्याचा प्रकार समोर आला आहे. जळगाव शहरातील शासकीय विश्रामगृहातील कर्मचारी क्वार्टवरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी मामाविरुद्ध रामानंद नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरामध्ये टीव्हीचा आवाज वाढवला म्हणून 10वर्षीय भाच्याला मामाने सरोटा तापवून हातावर आणि पायावर चटके दिले. याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या काकाने पोलिसात फिर्याद दिली.  
डेन्मार्क फुटबॉलपटू जोनास कुडसनच्या घरी आली परी

डेन्मार्क फुटबॉलपटू जोनास कुडसनच्या घरी आली परी

फिफा विश्वचषक स्पर्धेत शनिवारी डेन्मार्क आणि पेरू यांच्यात सामना झाला. या सामन्यात पेरूला डेन्मार्कने 1-0 असे पराभूत केले.  या सामन्यात डेन्मार्कने विजय मिळवल्यामुळे स्पर्धेत त्यांची विजयी सुरुवात झाली. त्याबरोबरच डेन्मार्कचा मिडफिल्डर असलेला जोनास कुडसन याच्यासाठी देखील हा दिवस खास ठरला. जोनासची पत्नी ट्राईन हिने बाळाला जन्म दिला. मंगळवारी या दोघांना कन्यारत्न झाले. 
बनावट कागदपत्रांद्वारे नागपुरात तीन बँकांना 104 कोटींचा गंडा

बनावट कागदपत्रांद्वारे नागपुरात तीन बँकांना 104 कोटींचा गंडा

बँकांच्या फसवणुकीत उपराजधानी नागपूरही मागे नाही. सध्या देशभरात बँक घोटाळे आणि फसवणुकीची प्रकरणे गाजत आहेत. बनावट कागदपत्रे सादर करून नागपुरातील 3बँकांना तब्बल 104 कोटींनी गंडा घालण्यात आल्याची प्रकरणे उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. यामध्ये इंडियन ओव्हरसिज बँकेला 1 कोटी 73 लाख, देना बँकेला 100 कोटी आणि युको बँकेची 2 कोटी 27 लाख 42 हजार रूपयांनी फसवणूक करण्यात आली आहे. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more