Short News

शेल कंपन्यांची आयटीआर न भरण्याची सवलत प्राप्तिकर विभागाकडून रद्द

शेल कंपन्यांची आयटीआर न भरण्याची सवलत प्राप्तिकर विभागाकडून रद्द

 शेल कंपन्यांविरोधातील मोहीम सरकारने तीव्र केली आहे. ३ हजार रुपयांपर्यंत कर देयता असलेल्या कंपन्यांना लागू असलेली प्राप्तिकर विवरणपत्र न भरण्याची सवलत रद्द केली आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर कायद्यातील तरतूद अधिक कडक करण्यात आली आहे. आयटीआर दाखल न केल्यास आता कंपन्यांना खटल्याला सामोरे जावे लागणार आहे. 
पॉर्न पाहणाऱ्या मुलाचा  जन्मदात्या आईवरच  बलात्कार

पॉर्न पाहणाऱ्या मुलाचा जन्मदात्या आईवरच बलात्कार

मोबाईलमध्ये अश्लिल (पॉर्न) व्हिडिओ पाहण्याचे व्यसन जडलेल्या एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईवरच बलात्कार केला. ही संतापजनक घटना गुजरातमधील पालनपूरमध्ये उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. आरोपी रात्र-दिवस अश्लिल चित्रपट पाहायचा. घरात आई व बहिणीसमोरही तो चित्रपट पाहायचा. रात्री १ च्या सुमारास पाणी प्यायच्या बहाण्याने तो आईच्या खोलीत गेला. आई झोपल्याचे पाहून त्याने बलात्कार केला. 
क्वालकॉम कंपनी दीड हजार लोकांना देणार नारळ

क्वालकॉम कंपनी दीड हजार लोकांना देणार नारळ

अमेरिकेची चिम मेकर कॅलिफोर्निया स्थित क्वॉलकॉम कंपनीतील नोकरदारावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. कंपनीने मोठ्या प्रमाणात नोकर कपात करणार आहे. याआधी कंपनी आपल्या गुंतवणूकधारकांना एक अब्ज डॉलरची कपात करण्याचे सांगितले होते. सॅन डियागो स्थित हेडक्वॉर्टर असलेली वायरलेस कंपनी 1,231 कर्मचाऱ्यांना आणि सॅन जोस, सांता क्लारा मधील 269 लोकांचा रोजगार जाणार आहे. 
जिओनी 26 एप्रिलला लॉन्च करणार स्मार्टफोन

जिओनी 26 एप्रिलला लॉन्च करणार स्मार्टफोन

चीनची स्मार्टफोन कंपनी जिओनी 26 एप्रिल रोजी आपला स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनची किमत 9 हजार ते 15 हजार रुपये असणार आहे. या मोबाईलचा फुल व्ह्यू डिस्प्ले असल्याने लोकांच्या पसंतीस उतरेल अशी आशा कंपनीला आहे. काही माध्यमांच्या वृत्तानुसार जिओनी कंपनी भारतातील आपला कारभार बंद करणार आहे. दरम्यान कंपनीकडून सांगण्यत आले की,कंपनी भारतातच राहिल पण कंपनी  मोबाईल्सचे मॉडेल बदलणार आहे.