Short News

३१ मार्चपर्यंत प्राप्तीकर न भरल्यास दंड

३१ मार्चपर्यंत प्राप्तीकर न भरल्यास दंड

आयकर विभागाने नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणात रोख बँकेत जमा करणाऱ्यांना आणि कंपन्यांना इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यास सांगितले आहे. यासाठी ३१ मार्च ही शेवटची मुदत देण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत प्राप्तीकर न भरल्यास दंड किंवा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे. पात्र संस्था, राजकीय पक्ष आणि संघटनांनाही प्राप्तिकर भरावा लागणार आहे.
देशातील डिझेलवरील वाहने महागण्याची शक्यता

देशातील डिझेलवरील वाहने महागण्याची शक्यता

येत्या काही दिवसांत भारतातील डिझेल वाहने अधिक महाग होऊ शकतात. डिझेल गाड्यांवरील कर वाढवला जाण्याची शक्यता आहे. यामुळे भारत सरकारच्या रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने सरकारला डिझेलवरील कारवरील कर 2% वाढवण्याची शिफारस केली आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिक वाहनांवरील कर कमी करण्यास मंत्रालयाने सरकारला सांगितले आहे. गाड्यांच्या इंजिन आणि बॉडीच्या आकारावरुन हा कर आकारला जातो 
छोट्या पडद्यावरील 'हा' प्रसिद्ध कॅमेडियन बनला गायक

छोट्या पडद्यावरील 'हा' प्रसिद्ध कॅमेडियन बनला गायक

'ओ पुष्पा आय हेट टीयर्स' हा 'राजेश खन्नाच्या तोंडी असलेला संवाद अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. या संवादावरुन Films @ 50 च्या बॅनरखाली एक नवीन चित्रपट येत आहे. ज्याचे नाव आहे 'ओ पुष्पा आय हेट टीयर्स'. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त एका गाण्याच्या रेकॉर्डिंगने संपन्न झाला. या चित्रपटाची खासियत म्हणजे विनोद सम्राट कृष्णा अभिषेक याने गाणे गायले आहे.
रावळपिंडीतील गावाला दिले मलाला युसूफजाईचे नाव

रावळपिंडीतील गावाला दिले मलाला युसूफजाईचे नाव

पाकिस्तानच्या रावळपिंडी जिल्ह्यातील एका गावाला नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसूफजाईचे नाव देण्यात आले आहे. पाकिस्तानातील सामाजिक कार्यकर्ते बशीर अहमद यांनी ट्विटरवरुन या संदर्भातील माहिती दिली. २०१२ मध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मलाला थोडक्यात बचावली होती. या नंतर ती परदेशात स्थलांतरित झाली होती. २०१४ साली वयाच्या सतराव्या वर्षी मलाला हिला नोबेल पारितोषिक मिळाले होते.