Short News

आठव्या तिमाहीतही जपानच्या अर्थव्यवस्थेत वाढ कायम

आठव्या तिमाहीतही जपानच्या अर्थव्यवस्थेत वाढ कायम

जपान देशाची अर्थव्यवस्था डिसेंबर २०१७मधील संपलेल्या तिमाहीत ०.१ने टक्क्यांनी वाढ झाली आहे. १९८०पासून ही आठव्या वेळा या वाढीची नोंद करण्यात आली आहे.मंत्रिमंडळ कार्यालयानुसार मागील वर्षी डिसेंबर महिन्यातील तिमाहीत आर्थिक वृद्धीही ०.१टक्के होती. ही वाढ अपेक्षापेक्षा कमी असल्याचे सांगितले आहे. जपानची अर्थव्यवस्था अमेरिका आणि चीननंतरची मोठी अर्थव्यवस्था आहे. 
विनोद गोएंका यांच्या भावाचं अपहरण

विनोद गोएंका यांच्या भावाचं अपहरण

डीबी रिअॅलिटी कंपनीचे मालक विनोद गोएंका यांचे भाऊ प्रमोद गोएंका यांचं आफ्रिकन देश मोझॅम्बिकमधून अपहरण झाल्याची माहिती आहे. शनिवारपासून प्रमोद गोएंका बेपत्ता असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. प्रमोद काही वर्षांपूर्वी बांधकाम व्यवसायातून बाहेर पडले होते. त्यांनी स्वतःचा दागिन्यांचा व्यवसाय सुरु केला आहे.
सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये किंचीतशी वाढ

सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये किंचीतशी वाढ

पीएनबी घोटाळ्यानंतर गडगडलेल्या शेअर बाजार मंगळवारी सावरलेला दिसला. आज सकाळच्या सत्रात सेंसेक्समध्ये 150 अंकाची तर राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टीमध्ये 40 अंकाची वाढ झाली आहे. सध्या सेंसेक्स 33926.57 वर व्यवहार करत असून निफ्टी मध्ये 10417.35 अंकाची वाढ आहे. तरीही बँकेचे शेअर खाली येत आहे.
ज्येष्ठ समाजवादी नेत्या कमल देसाई यांचे निधन

ज्येष्ठ समाजवादी नेत्या कमल देसाई यांचे निधन

ज्येष्ठ समाजवादी नेत्या माजी आमदार कमल देसाई यांचे गोरेगाव येथे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्या ९७ वर्षाच्या होत्या. कमल देसाई ह्या आणीबाणीच्या काळात तरुंगात होत्या. त्यांनी मृणाल गोरे यांच्यासह अनेक आंदोलनात सहभाग घेतला. गोरगरीबांच्या हक्कांसाठी त्यांनी अनेक आंदोलन केले.