Short News

व्हॅलेंटाईन डे असूनही गुलाब फूल मार्केटवर अवकळा

व्हॅलेंटाईन डे असूनही गुलाब फूल मार्केटवर अवकळा

आज व्हॅलेंटाईन डे असूनही गुलाब फूल मार्केटवर अवकळाच पसरली आहे. मार्केटमध्ये गुलाब फुलांची आवक तर वाढली आहे. पण त्याला कसलाही उठाव नसल्यामुळे ऐन व्हॅलेंटाईन डे दिवशीच फूल व्यापारी हवालदिल झाले आहेत. शिवसेना, बजरंग दल यासारख्या संघटना व्हॅलेंटाईन-डेविरोधात सातत्याने आंदोलन करत असतात. त्यामुळे त्याला घाबरूनही लोक व्हॅलेंटाईन डेला प्रत्यक्ष फूल देण्याचे टाळत असावेत.
आगामी आर्थिक वर्षात आठ सरकारी कंपन्याचे आयपीओ

आगामी आर्थिक वर्षात आठ सरकारी कंपन्याचे आयपीओ

एक एप्रिल पासून सुरू होणाऱ्या आगामी आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ८ सरकारी कंपन्या आयपीओच्या माध्यमातून भांडवली बाजारात प्रवेश करणार आहेत. त्यात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) व राइट्स लिमिटेडही सहभागी आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. या कंपन्या योग्यवेळी भांडवली बाजारात प्रवेश करतील. हिंदुस्तान अॅरोनॉटिक्स आयपीओ आणण्यासाठी बाजार नियामक सेबीची अगोदरच मंजुरी आहे. 
मालदीवमधील आणीबाणीला मुदतवाढ द्या - राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन

मालदीवमधील आणीबाणीला मुदतवाढ द्या - राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन

मालदीवचे राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांनी देशात लागू असलेल्या आणीबाणीला १५ दिवसांची वाढीव मुदत मिळावी, अशी आज संसदेला विनंती केली आहे. देशात राजकीय अराजक असल्यामुळे ही मुदत वाढावी, असे अब्दुल्ला यामीन यांनी म्हटले आहे. मालदीवच्या संसदेमध्ये बोलाविण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांच्या विनंतीवर चर्चा करण्यात आली. 
शेअर बाजार गडगला;  सेन्सेक्स २३६ अंकांनी तर निफ्टी ७४ अंकांनी घसरला

शेअर बाजार गडगला; सेन्सेक्स २३६ अंकांनी तर निफ्टी ७४ अंकांनी घसरला

 सोमवारी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स २३६ अंकांनी घटत ३३, ७७४ वर आला. तर निफ्टी ७४ अंकांनी उतरत १०,३७८ वर व्यवहार बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये मिडकॅपमध्ये १.०७ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅपमध्ये १.४२ टक्यांनी घट झालेली दिसली. बीएसईमधील सर्व १९ सेक्टरच्या शेअर्स घसरण झालेली दिसली.