Short News

ओला 10 हजार इलेक्ट्रिक वाहनांशी करणार भागीदारी

ओला 10 हजार इलेक्ट्रिक वाहनांशी करणार भागीदारी

कार सेवा देणारी ओला कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन मिळण्यासाठी एक प्रकल्प हाती घेतला आहे. पुढील एक वर्षा कंपनी 10 हजार वाहनांशी करार करणार आहे. यात अधिकप्रमाणात ई-रिक्षाचां समावेश असणार आहे. कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल यांच्या मते रोज लाखो लोक रिक्षाने प्रवास करतात. यामुळे रिक्षांनी आपल्या कंपनीशी जोडणार असल्याचे म्हणाले.
सत्तेसाठी मिझोरममध्ये कट्टर विरोधक भाजपा-काँग्रेस एकत्र

सत्तेसाठी मिझोरममध्ये कट्टर विरोधक भाजपा-काँग्रेस एकत्र

एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले भाजप व काँग्रेस मिझोरममध्ये एकत्र आले आहेत. मिझोरममधील चकमा स्वायत्त जिल्हा परिषदेत सत्तेसाठी भाजप-काँग्रेसने हातमिळवणी केली. 20 जागांपैकी काँग्रेसला 6 तर भाजपला 5 जागा मिळाल्या आहेत. तर मिझो नॅशनल फ्रंटने 8 जागा मिळवल्या. निकालानंतर काँग्रेस व भाजपने एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे क्रीडामंत्री व काँग्रेस नेते झोडिंतुलंगा यांनी दिली. 
'या' फलंदाजाने मारला या सत्रातील सर्वात लांब  षटकार

'या' फलंदाजाने मारला या सत्रातील सर्वात लांब षटकार

एबी डेविलियर्स आणि क्विंटन डी कॉक यांच्या आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर बंगळूरुने चेन्नईविरुद्ध सामन्यात 205 धावा केल्या. डेविलियर्सने 30 चेंडूत 8 षटकार आणि 2 चौकारांच्या सहाय्याने ६८ धावा केल्या. डिविलियर्सने ठाकूरच्या गोलंदाजीवर सलग 3 षटकार ठोकले. यातील एक तब्बल 111मीटर लांब गेला. यंदाच्या आयपीएलमधील हा सर्वात लांब षटकार आहे. चेंडू स्टेडियमच्या बाहेर निघून गेल्याने अंपायरने नवा चेंडू मागवला. 
धवन आणि स्मृती मानधनाची अर्जुन पुरस्कारासाठी तर कोहलीची खेलरत्नसाठी   शिफारस

धवन आणि स्मृती मानधनाची अर्जुन पुरस्कारासाठी तर कोहलीची खेलरत्नसाठी शिफारस

बीसीसीआयने सलामीचा शिखर धवन आणि महिला क्रिकेटर स्मृती मानधना यांच्या नावाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी बीसीसीआयने विराट कोहलीची शिफारस केली आहे. बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांनी ही माहिती दिली. शिखर धवन हा तिन्ही फॉरमॅट्समध्ये खेळणारा टीम इंडियाचा नियमित सलामीचा फलंदाज आहे.