पुढील 2 वर्षांत ऑनलाइन खरेदीत महिलांची संख्या वाढणार
व्यापार
- 10 days ago
देशात आगामी दोन वर्षांत ऑनलाइन खरेदीत महिलांचा दबदबा वाढेल. एकूण ऑनलाइन खरेदीत महिलांची संख्या तब्बल अडीच पट वाढेल. लहान शहरे आणि जास्त वयाच्या खरेदीदारांची हिस्सेदारीही वाढेल. 2017मध्ये महानगरांत आणि प्रथम श्रेणीच्या मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, चेन्नई या शहरांत ऑनलाइन खरेदीचा वाटा 60 टक्के होता. तो 2020 मध्ये घटून 51 % राहणार असल्याची शक्यता आहे.