Short News

ओप्पोच्या आगामी 'F7' स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा इतक्या मेगापिक्सेल असणार

ओप्पोच्या आगामी 'F7' स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा इतक्या मेगापिक्सेल असणार

आपल्या स्टायलिश हँडसेटमुळे लोकप्रिय असलेली ओप्पो कंपनी आपला 'F7' स्मार्टफोन लवकरच बाजारात आणणार आहे. 25 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा, हे या स्मार्टफोनच्या आकर्षणाचं केंद्र असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. 26 मार्च रोजी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात 'ओप्पो F7' स्मार्टफोन लॉन्च केला जाणार आहे. ओप्पोनेही या स्मार्टफोनच्या लॉन्चिंगसाठी खास तयारी केली आहे.
शिवसेनेने खरे रूप दाखवले - पृथ्वीराज चव्हाण

शिवसेनेने खरे रूप दाखवले - पृथ्वीराज चव्हाण

शिवसेना दुटप्पी असल्याचे आणखी एक उदाहरण दिसून आले असून विश्वासदर्शक ठरावातून शिवसेनेचे खरे रूप समोर आल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. विधानसभेत अध्यक्षांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. याला शिवसेनेचे विधिमंडळ नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुमोदन दिले.
इंग्लंडमध्ये समोसा वीकचं आयोजन

इंग्लंडमध्ये समोसा वीकचं आयोजन

गरमागरम आणि खमंग समोसा आता इंग्लंडवासीयांची भूक भागवणार आहे. भारतीय लोकांचा आवडता असणारा हा समोसा, आता इंग्लंडमध्ये दिसणार आहे. इंग्लंडच्या लेस्टर शहरात समोसा वीक साजरा केला जाणार आहे. 9 ते 13 एप्रिल दरम्यान इंग्लंडमधल्या खवय्यांना या समोशाचा आस्वाद घेता येणार आहे. दक्षिण आशियातल्या खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देण्यासाठी या समोसा वीकचं आयोजन करण्यात आलंय.
फ्रान्सच्या सुपरमार्केटमध्ये बंदुकधाऱ्यांनी नागरिकांना ठेवले ओलीस

फ्रान्सच्या सुपरमार्केटमध्ये बंदुकधाऱ्यांनी नागरिकांना ठेवले ओलीस

फ्रान्समधील ट्रीबीस येथील सुपर मार्केटमध्ये आठ जणांना बंधक बनवण्यात आले आहे. नागरिकांना ओलीस ठेवणाऱ्या हल्लेखोराने पोलिसांवर गोळीबारही केला आहे. हल्लेखोराने आपण इसिसशी संबंधित असल्याचे म्हटले आहे. बीएफएम टीव्हीने आपल्या वृत्तात असे म्हटले आहे. दहशतवादविरोधी पथक घटनास्थळी पोहोचले असून ते परिस्थिती हाताळत आहे असे फ्रान्स सरकारकडून सांगण्यात आले आहे.