Short News

रिलायन्स आणतोय जिओ होम टीव्ही

रिलायन्स आणतोय जिओ होम टीव्ही

 रिलायन्स जिओ आता ब्रॉडबँड सर्व्हिस आणि डायरेक्ट टू होम सेवेवर काम करत आहे. याबाबत अनेक वृत्तही समोर आले आहेत. अशातच जिओ आता JioHomeTV ही नवी सेवा लाँच करणार असल्याचे वृत्त आहे. टेलिकॉम टॉकच्या वृ्त्तानुसार ग्राहकांना 200 एसडी आणि एचडी चॅनल मिळतील. याची किंमत 400 रुपयांपासून असणार आहे. दरम्यान JioHomeTV ही सेवा कंपनीची डीटीएच सेवा असेल की नवी सेवा आहे, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
'केसरी' चित्रपटाच्या सेटला भीषण आग, अक्षय कुमार सुखरुप

'केसरी' चित्रपटाच्या सेटला भीषण आग, अक्षय कुमार सुखरुप

सुपरस्टार अक्षय कुमार याच्या 'केसरी' चित्रपटाचे शूटींग सातारा जिल्ह्यातील वाई परिसरात सुरू आहे. पिंपोडे बुद्रूक या गावात सिनेमाचा एक भव्य सेट उभारण्यात आला होता. अचानक या सेटला आग लागल्याने संपूर्ण सेट भस्मसात झाला आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी वेळीच दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने अक्षय कुमारसह सर्वजण सुखरुप आहेत.'केसरी' हा चित्रपट साराग्रहीच्या युध्दावर आधारित आहे. 
रेस3 च्या चित्रीकरणासाठी सलमान जम्मू- काश्मीरच्या दौऱ्यावर

रेस3 च्या चित्रीकरणासाठी सलमान जम्मू- काश्मीरच्या दौऱ्यावर

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने पुन्हा एकदा त्याचा मोर्चा आगामी चित्रपटांकडे वळवला आहे. सध्याच्या घडीला तो आगामी रेस3 या चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्राधान्य देत असून, या चित्रपटाच्या पुढील चित्रीकरणासाठी जम्मू-काश्मीर राज्याला भेट दिली. यावेळी त्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतल्याचे पाहायला मिळाले. या दौऱ्यादरम्यान सलमानने जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची भेट घेतली. 
शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 74 अंकांनी खाली

शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 74 अंकांनी खाली

जागतिक बाजारात असलेल्या मंदीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला. आज बाजाराच्या सुरुवातीलाच घसरण झालेली दिसली. सेन्सेक्स 74.48 अंकांनी म्हणजे 0.22 टक्क्यांनी खाली येत 34,542 वर आला. तर निफ्टी 1.95 अंक म्हणजे 0.02 टक्क्यांनी खाली येत 10,612.40 अंकांवर सुरु झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅपच्या शेअर्स मध्येही घसरण झालेली दिसली. बीएसईच्या मिडस्कॅप इंडेक्स 0.06 टक्के खाली आले आहे.