Short News

एसबीआयने ४१.१६ लाख बचत खाती केली बंद

एसबीआयने ४१.१६ लाख बचत खाती केली बंद

मिनिमम बॅलन्स न ठेवल्याने स्टेट बँक ऑफ इंडियाने ४१.१६ लाख बचत खाती बंद केली आहेत. १ एप्रिल ते ३१ जानेवारी या कालावधीत ज्या खातेदारांना मिनिमम बॅलन्सही ठेवता आलेला नाही अशी खाती आहेत. माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात महिन्याचा मिनिमम बॅलन्स न ठेवणाऱ्या किंवा मिनिमम बॅलन्सपेक्षा कमी रक्कम ठेवणाऱ्या बचत खात्यांसाठी दंडाचे शुल्क कमी केले होते. 
केन विलियमसनच्या नावावर नवा रेकॉर्ड

केन विलियमसनच्या नावावर नवा रेकॉर्ड

न्यूझीलंडच्या केन विल्यमसनने इंग्लंड विरोधात पहिल्या टेस्ट मॅचमध्ये १८वी सेंच्युरी झळकावली आहे. या सेंच्युरीसोबतच केन विलियमसनने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. या शानदार इनिंग सोबतच केन विलियमसनने न्यूझीलंडतर्फे टेस्ट मॅचेसमध्ये सर्वाधिक सेंच्युरी लगावण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
शिवसेनेने खरे रूप दाखवले - पृथ्वीराज चव्हाण

शिवसेनेने खरे रूप दाखवले - पृथ्वीराज चव्हाण

शिवसेना दुटप्पी असल्याचे आणखी एक उदाहरण दिसून आले असून विश्वासदर्शक ठरावातून शिवसेनेचे खरे रूप समोर आल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. विधानसभेत अध्यक्षांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. याला शिवसेनेचे विधिमंडळ नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुमोदन दिले.
इंग्लंडमध्ये समोसा वीकचं आयोजन

इंग्लंडमध्ये समोसा वीकचं आयोजन

गरमागरम आणि खमंग समोसा आता इंग्लंडवासीयांची भूक भागवणार आहे. भारतीय लोकांचा आवडता असणारा हा समोसा, आता इंग्लंडमध्ये दिसणार आहे. इंग्लंडच्या लेस्टर शहरात समोसा वीक साजरा केला जाणार आहे. 9 ते 13 एप्रिल दरम्यान इंग्लंडमधल्या खवय्यांना या समोशाचा आस्वाद घेता येणार आहे. दक्षिण आशियातल्या खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देण्यासाठी या समोसा वीकचं आयोजन करण्यात आलंय.