Short News

शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स १४४ अंकांनी खाली

शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स १४४ अंकांनी खाली

रिझर्व्ह बँकेने वाढत्या एनपीएला आळा घालण्यासाठी इतर बँकांवर कठोर नियम लावण्यात आले. यामुळे पीएसयू बँकांमधील शेअर्स समभाग कमी झाले आहेत. यामुळे आज दिवसभर डेमोस्टिक शेअर्स बाजारात चढ-उतार दिसली. सरकारी बँकांसह खासगी बँकांमधील शेअर्स विक्री वाढल्याने सेन्सेक्स १४४ अंकांनी खाली ३४,१५६ यावर बंद झाला. तर निफ्टी ३९ अंकांनी घसरत १०,५०१ अंकांवर बंद झाला. सकाळी निफ्टी १०,५८५.७५ अंकांवर होता.
अभिनेता वरुण धवन लवकरच लग्नबंधनात अडकणार

अभिनेता वरुण धवन लवकरच लग्नबंधनात अडकणार

वरुण धवन त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल सोबत विवाह करणार आहे. नताशा आणि वरुण हे अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. नताशा दलाल वरुण आणि त्याची को-स्टार यांच्यापासून सुरक्षित राहू इच्छिते. म्हणून ती लवकरात लवकर विवाह करु इच्छिते आहे. नताशाचे कुटुंबिय देखील या विवाहासाठी तयार आहेत.
पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचा जवान शहीद

पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचा जवान शहीद

पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारत बीएसएफचा एक जवान शहीद झाला आहे. जम्मू आणि कश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात ही घटना घडली.बीएसएफच्या प्रवक्त्याने यासंदर्भात दिलेली माहिती अशी, की पाकिस्तानी सैनिकांनी सीमेलगत असलेल्या तंगधार भागात मंगळवारी स्नायपरने गोळीबार केला असल्याचे म्हटले आहे. एसके मुरमू, असे शहीद झालेल्या बीएसएफच्या जवानाचे नाव आहे.
हाफिज सईदला पाकिस्तान सरकारचा दणका, जमात-उद-दावाची संपत्ती जप्त

हाफिज सईदला पाकिस्तान सरकारचा दणका, जमात-उद-दावाची संपत्ती जप्त

दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तान सरकारने पुन्हा एकदा जबरदस्त दणका दिला आहे. पाकिस्तान सरकारने हाफिजच्या जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेची संपत्ती जप्त केली आहे. हाफिज सईदच्या जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इनसाइनेट फाउंडेशनशी संबंधित तैराकी अकादमी, शाळा-रुग्णालय आणि रुग्णवाहिका सेवादेखील पाकिस्तान सरकारने आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. .