Short News

शेअर बाजारात वृद्धी , निफ्टी 10750 अंकांवर

शेअर बाजारात वृद्धी , निफ्टी 10750 अंकांवर

गुरुवारी भारतयी शेअर बाजार तेजीने सुरू झाला. सेन्सेक्स 96 अंकांनी वाढत 35,484 अंकांवर पोहोचला. तर निफ्टीची सुरुवात 34 अंकांनी वाढत 10,776 वर पोहोचला आहे. बाजाराची सुरुवात होताच सेन्सेक्समध्ये वृद्धी झाली होती. मिडकॅप आणि स्मॉलकॅपच्या शेअर्स वाढ होताना दिसत आहे. काल कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद बुधवारीही शेअर बाजारात दिसले होते. बुधवारी बाजार 156 अंकांनी घसरलेला होता. 
केवळ काँग्रेस-जेडीएस आनंद साजरा करताहेत : अमित शहा

केवळ काँग्रेस-जेडीएस आनंद साजरा करताहेत : अमित शहा

कर्नाटकमध्ये पूर्वी ४० जागा असलेल्या भाजपाने यंदा १४० जागा जिंकल्या. यावरुन जनादेश हा काँग्रेसविरोधातच असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे काँग्रेस-जेडीएसची सत्ता स्थापन होत असताना कर्नाटकची जनता नव्हे तर केवळ काँग्रेस-जेडीएसच आनंद साजरा करीत आहेत, अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
पालघर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री आज ठाण्यात

पालघर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री आज ठाण्यात

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष पेटला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज ठाण्यात एमएमआरडीएच्या विविध प्रकल्प उद्घाटन आणि प्रकल्प भूमिपूजनां च्या कार्यक्रमांसाठी येत आहेत. यावेळी राज्य मंत्रीमंडळातील मुख्यमंत्र्याचे सहकारी, कॅबिनेट मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे सर्वाचं लक्ष असेल.
बिग बॉसच्या घरात ‘आक्कासाहेब’ हिट

बिग बॉसच्या घरात ‘आक्कासाहेब’ हिट

अभिनेत्री हर्षदा खानविलकरने ‘आक्कासाहेब' ही भूमिका साकारुन टेलिव्हिजन विश्वात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तिने साकारलेल्या या भूमिकेला प्रेक्षकांनी जणू काही डोक्यावरच उटलून घेतलं होतं. याच लोकप्रियतेच्या बळावर तिला बिग बस मराठीच्या घरात प्रवेश मिळाला. हर्षदाच्या व्यक्तीमत्त्वाप्रमाणेच तिची या घरात अगदी दणक्यात एंट्री झाली. ज्यामुले या कार्यक्रमाच्या टीआरपी रेटिंगमध्येही वाढ झाली.