Short News

टाटा स्टील कंपनीने ६ वेळा मिळवला 'मोस्ट एथिकल कंपनी'चा पुरस्कार

टाटा स्टील कंपनीने ६ वेळा मिळवला 'मोस्ट एथिकल कंपनी'चा पुरस्कार

एथिस्फेअर इस्टीट्यूटकडून २०१८ या वर्षासाठी टाटा स्टील कंपनीला 'मोस्ट एथिकल कंपनी' पुरस्कार मिळाला आहे. धातू, खजिने आणि खाण कामाच्या श्रेणीत टाटा स्टीलला नैतिक कंपनीचा हा सन्मान सहाव्या वेळा मिळणार आहे. २०१८ मध्ये २३ देशांच्या १३५ कंपन्यांचा सन्मानित करण्यात आले आहे. सोमवारी या पुरस्कार विजेत्या कंपनींचे नाव घोषित केले आहे. १२ मार्च रोजी त्यांना पुरस्कार दिला जाणार आहे. 
एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये प्रवाशांना मिळाले हे खास सरप्राईज
<iframe src="https://www.facebook.com/plugins/video.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fdhol.blasters.75%2Fvideos%2F2107552549467555%2F&show_text=0&width=267" width="100%" height="300" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true" allowFullScreen="true"></iframe>

एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये प्रवाशांना मिळाले हे खास सरप्राईज

एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये प्रवाशांना खास सरप्राईज मिळाले. फ्लाईट टेक ऑफ होत असताना ढोल वाजवून प्रवाशांचे मनोरंजन करण्यात आले. ढोलसोबत गायलेले पंजाबी गाणे लोकांनी खूप एन्जॉय केले. लोकांनी याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर देखील केला. फेसबुक पेज ढोल ब्लास्टर्स वर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला.
आजीबाईंच्या शाळेची नोंद आता लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

आजीबाईंच्या शाळेची नोंद आता लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

गावातील साठीनंतरच्या पिढीला शिक्षित करण्याचा संकल्प मुरबाडजवळील नाणेघाटाच्या पायथ्याशी असलेल्या फांगणे गावातील ग्रामस्थांनी केला. दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या प्रयत्नांची दखल बघता बघता राष्ट्रीयच नाही तर आंतराष्ट्रीय पातळीवरदेखील घेतली गेली. ६० हून अधिक वय असलेल्या या आजीबाईंच्या शाळेची नोंद आता लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.
जिग्नेश मेवाणीने केला हा गंभीर आरोप

जिग्नेश मेवाणीने केला हा गंभीर आरोप

व्हॉट्स अॅप ग्रुपवरची चर्चा व्हायरल झाल्यानंतर गुजरातचे दलित नेते आणि आमदार जिग्नेश मेवाणी यांनी आपल्या बचाव आणि सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे. या ग्रुपमधील पोलीस अधिकाऱ्यांचे संभाषण व्हायरल झाल्यावर जिग्नेश मेवाणींनी असा आरोप केला आहे की हे पोलीस अधिकारी माझ्या एन्काऊंटरची चर्चा करत होते. त्यामुळे मला संरक्षणाची आवश्यकता आहे असेही जिग्नेश मेवाणी यांनी म्हटले आहे.