Short News

राधिकाने पायाला गुदगुल्या करणाऱ्या अभिनेत्याच्या कानशिलात लागवली

राधिकाने पायाला गुदगुल्या करणाऱ्या अभिनेत्याच्या कानशिलात लागवली

अभिनेत्री राधिका आपटे हिने नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये तिला आलेल्या वाईट अनुभव सांगितला. 'एका तामिळ चित्रपटात काम करत असताना सेटवर पहिल्याच दिवशी दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता पायाला गुदगुल्या करू लागला. याआधी त्याची-माझी भेट कधीही झाली नव्हती. त्यामुळं मी हडबडून गेले. मी थेट त्याच्या कानशिलात भडकावली,' असे तिने सांगितले. याआधीही राधिका बॉलिवूडमधील कास्टिंग काऊच बिनधास्त बोलली होती. 
वाढलेल्या तापमानामुळे ऑस्ट्रेलियातील जंगलात आग, शंभर घरे जळून खाक

वाढलेल्या तापमानामुळे ऑस्ट्रेलियातील जंगलात आग, शंभर घरे जळून खाक

दक्षिण पूर्व ऑस्ट्रेलियात असलेल्या जंगलात आग लागली असून यात शंभर घरे जळल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने कोणीच गंभीर जखमी झालेले नाही. वृत्तानुसार टाथरा येथे आग लागल्याने 70 घरे जळून खाक झाली आहेत. न्यू साऊथ वेल्स रुरल फायर सर्व्हिसचे दोन जवान जखमी झाले आहेत. तर धूर शरीरात गेल्याने 4 जणांचा मृत्यू झाला.जोरदार हवा आणि वाढलेल्या तापमानामुळे ही आग लागली असून ही आग 1,070 हेक्टर क्षेत्रात पसरली. 
रोहिंग्या संकटातून बाहेर पडण्यासाठी म्यानमारची अशियान देशांकडे धाव

रोहिंग्या संकटातून बाहेर पडण्यासाठी म्यानमारची अशियान देशांकडे धाव

म्यानमार देशाची पंतप्रधान आँग सान सू की यांनी दक्षिण पूर्व अशियान देशांकडून रोहिंग्या संकटासाठी मदत मागितली आहे. सिडनी येथे झालेल्या ऑस्‍ट्रेलिया आसियान समिटच्या वेळी नेत्यांच्या बैठकीत मानव निर्मित संकटावर चर्चा झाली. यादम्यान आँग साग सू की यांनी रोहिंग्याचा मुद्दा उपस्थित करत आशियान देशांकडून मदत मागितली. आँग साग सू की यांनी माणूसकीच्या नाते मदत मागितल्याचे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणाले.
पर्यटन क्षेत्रात वाढ होण्यासाठी विविध देशातील ३० ब्लॉगर केरळात दाखल

पर्यटन क्षेत्रात वाढ होण्यासाठी विविध देशातील ३० ब्लॉगर केरळात दाखल

फ्रान्स, अमेरिका आणि जर्मनीसह विविध देशातील ३० ब्लॉगर केरळमध्ये दाखल झाले आहेत. केरळ राज्यातील समृद्ध पर्यटन क्षेत्रात वाढ व्हावी यासाठी विविध देशातील ब्लॉगर आले आहेत. रविवारी त्यांनी केरळ राज्याची यात्रा केली. इटली,स्पेन बुलगारिया, रोमानिया, वेनेजुएला येथीलही ब्लॉगर आले आहेत. यादरम्यान ते ब्लॉग एक्सप्रेस 5 व्या अभियानादरम्यान यात्रा केली.