Short News

पाहा  ! अजय अन् इलियानाची जबरदस्त केमिस्ट्री, 'सानु एक पल' गाणे रिलीज
<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/13z2kF6TiCc" frameborder="0" allow="autoplay; encrypted-media" allowfullscreen></iframe>

पाहा ! अजय अन् इलियानाची जबरदस्त केमिस्ट्री, 'सानु एक पल' गाणे रिलीज

अभिनेता अजय देवगन आणि अभिनेत्री इलियाना डिक्रूजची जोडी परत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बादशाहो चित्रपटातील 'रश्क-ए-कमर' मध्ये दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना चांगलीच आवडली होती. आता परत दोन्ही 'रेड' या चित्रपटात सोबत दिसणार आहेत. याशिवाय दोघांवर 'सानु एक पल' हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. यातही दोघांची केमिस्ट्री जबरदस्त दिसत आहे. राहत फतेह अली खान ने हे गाणे गायले आहे. 
सिरीयामध्ये लष्कराने केलेल्या हल्ल्यात ९४ लोकांचा मृत्यू

सिरीयामध्ये लष्कराने केलेल्या हल्ल्यात ९४ लोकांचा मृत्यू

सीरियामध्ये सेना आणि त्याच्या सहयोगी संघटनांनी २४ तासात केलेल्या हल्ल्यात ९४ लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटेनमधील संघटना 'सीरियन आब्जर्वेटरी फार ह्यूमन राइट्सने म्हटलं की, दमिश्कच्या उपनगरात केलेल्या हवाई हल्ल्यात ३२५ लोकं जखमी झाले. दमिश्क सरकारने म्हटलं की, हल्ला फक्त दहशतवाद्यांना लक्ष्य करुन करण्यात आला.
विनोद गोएंका यांच्या भावाचं अपहरण

विनोद गोएंका यांच्या भावाचं अपहरण

डीबी रिअॅलिटी कंपनीचे मालक विनोद गोएंका यांचे भाऊ प्रमोद गोएंका यांचं आफ्रिकन देश मोझॅम्बिकमधून अपहरण झाल्याची माहिती आहे. शनिवारपासून प्रमोद गोएंका बेपत्ता असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. प्रमोद काही वर्षांपूर्वी बांधकाम व्यवसायातून बाहेर पडले होते. त्यांनी स्वतःचा दागिन्यांचा व्यवसाय सुरु केला आहे.
सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये किंचीतशी वाढ

सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये किंचीतशी वाढ

पीएनबी घोटाळ्यानंतर गडगडलेल्या शेअर बाजार मंगळवारी सावरलेला दिसला. आज सकाळच्या सत्रात सेंसेक्समध्ये 150 अंकाची तर राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टीमध्ये 40 अंकाची वाढ झाली आहे. सध्या सेंसेक्स 33926.57 वर व्यवहार करत असून निफ्टी मध्ये 10417.35 अंकाची वाढ आहे. तरीही बँकेचे शेअर खाली येत आहे.