Short News

अमिताभ बच्चन यांचा 'ठग्ज ऑफ हिंदुस्थान'मधील लूक व्हायरल

अमिताभ बच्चन यांचा 'ठग्ज ऑफ हिंदुस्थान'मधील लूक व्हायरल

'ठग्ज ऑफ हिंदुस्थान' सिनेमातील एका पात्राचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सिनेमातील अद्याप कोणत्याच भूमिकेचा लूक समोर आला नव्हता. मात्र आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो 'ठग्ज ऑफ हिंदुस्थान' सिनेमातील असल्याचे म्हटले जात आहे. महानायक अमिताभ बच्चन या सिनेमात एका वृद्धाच्या भूमिकेत असल्याचे या व्हायरल फोटोतून दिसत आहेत.
राज्यसभेसाठी रेखा यांच्या जागेवर अक्षयकुमारची वर्णी ?

राज्यसभेसाठी रेखा यांच्या जागेवर अक्षयकुमारची वर्णी ?

कला, संस्कृती, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातून राज्यसभेसाठी राष्ट्रपतींकडून १२ जणांना निवडण्यात येते. सध्या असलेल्या १२ लोकांपैकी तीन सदस्यांचा कार्यकाल एप्रिल महिन्यात संपुष्टात येणार आहे. विशेष म्हणजे हे तीनही खासदार मुंबईतून येतात. राज्यसभेवर जाण्यासाठी चित्रपटसृष्टी आणि लेखकांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. परंतु सध्या अक्षयकुमारचे नाव यात आघाडीवर असल्याचे सांगण्यात येते. 
फुलपूर -गोरखपूर पोटनिवडणुकीचा काँग्रेसलाही फटका, राज बब्बर यांचा राजीनामा

फुलपूर -गोरखपूर पोटनिवडणुकीचा काँग्रेसलाही फटका, राज बब्बर यांचा राजीनामा

उत्तरप्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. फुलपूर आणि गोरखपूर लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसची कामगिरी निराशाजनक होती. त्यामुळे सपा आणि बसपाच्या विजयात काँग्रेसला आनंद मानावा लागला होता. या पराभवाच्या पार्श्वभूमीवरच बब्बर यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. कवी केदारनाथ सिंह यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी ट्विटमध्ये याचे संकेत दिले होते. 
21 मार्च 2018 : पेट्रोल- डिझेलच्या दरात स्थिरता

21 मार्च 2018 : पेट्रोल- डिझेलच्या दरात स्थिरता

आज मुंबई आणि दिल्लीच्या बाजारात पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणतीच वाढ झालेली नाही. बाजारात काल असलेल्या दरातच पेट्रोल-डिझेलची विक्री होत आहे. मुंबईत पेट्रोल 80.07 रुपये प्रतिलिटर आहे. तर डिझेल डिझेल 66.88 रुपये प्रतिलिटर आहे. राजधानी दिल्लीच्या बाजारात पेट्रोल प्रतिलिटर 72.20 रुपये, तर डिझेलचे प्रतिलिटरसाठीचे दर 62.80 रुपये आहे. कालही हाच दर बाजारात होता.