Short News

'व्हॅलेंटाइन्स डेनिमित्त अमिताभ बच्चन यांनी शेअर केला  'परफेक्ट कपल'चा फोटो

'व्हॅलेंटाइन्स डेनिमित्त अमिताभ बच्चन यांनी शेअर केला 'परफेक्ट कपल'चा फोटो

महानायक अमिताभ बच्चन यांनी पत्नी जया बच्चन यांना 'व्हॅलेंटाइन्स डे'च्या रोमॅन्टिक अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ आणि जया यांच्या लग्नाला ४० वर्षांपेक्षाही जास्त वर्षे झाली असली तरी आजही त्यांच्याकडे एक परफेक्ट कपल म्हणून पाहिले जाते. अमिताभ यांनी व्हॅलेंटाइन्सनिमित्त  ट्विटरवर जया यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी गोड आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. 
दीपिका पुन्हा रानी बनण्यासाठी सज्ज

दीपिका पुन्हा रानी बनण्यासाठी सज्ज

पद्मावतमध्ये महाराणी पद्मिनीची भूमिका साकारल्यानंतर दीपिका पुन्हा एकदा राणी बनण्यासाठी सज्ज झाली आहे. आता सपना दीदीच्या बायोपिकमध्ये दीपिका झळकणार आहे. या सिनेमाचे नाव रानी आहे. या सिनेमासाठी दीपिका जय्यद तयारी करत आहे. यात दीपिका एका डॉनची भूमिका साकारणार आहे.
'पीएनबी' अपहार प्रकरणात 'हनी ट्रॅप'चा वापर

'पीएनबी' अपहार प्रकरणात 'हनी ट्रॅप'चा वापर

पंजाब नॅशनल बँक अपहार प्रकरणात मुख्य आरोपी नीरव मोदी याची पत्नी एमी मोदी हिचीही भूमिका महत्त्वाची असल्याचं उघडकीस आलंय. पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाऱ्यांकडून गैरकारभार करुन घेण्यासाठी एमी मोदीनं 'हनी ट्रॅप'चा वापर केल्याची माहिती सूत्रांकडून समजतेय. यासाठी तिनं काही मॉडेल्सचीही मदत घेतल्याचं उघड झालंय.
डी. एस. कुलकर्णीला सात दिवसांची पोलीस कोठडी

डी. एस. कुलकर्णीला सात दिवसांची पोलीस कोठडी

पुणे सत्र न्यायालयाने प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने डीएसकेंना अटकेपासून दिलेले संरक्षण काल काढून घेतल्यानंतर आज पहाटे पुणे पोलिसांनी डीएसके व त्यांच्या पत्नीला दिल्लीतील हॉटेलमधून अटक केली. या दोघांनाही आता पुढचे सात दिवस कोठडीत काढावे लागणार आहेत.