Short News

किक २ मध्ये  अभिनेत्री अॅमी जॅक्सनची वर्णी लागण्याची शक्यता

किक २ मध्ये अभिनेत्री अॅमी जॅक्सनची वर्णी लागण्याची शक्यता

गेल्याच आठवड्यात दिग्दर्शक साजिद नाडियादवालाने ‘किक २'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. २०१९ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सलमानची नायिका कोण होणार? याची चर्चा रंगली आहे. ‘किक'मध्ये जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत दिसली होती. परंतु किक २ मध्येही कदाचित जॅकलिन ऐवजी अॅमी जॅक्सनचे नाव सध्या चर्चेत येत आहे. अॅमी या चित्रपटात सलमान सोबत मुख्य भूमिकेत दिसेल अशी चर्चा रंगली आहे.
हैदराबाद संघाचा आणखीन एक गोलंदाज आयपीएलमधून बाहेर

हैदराबाद संघाचा आणखीन एक गोलंदाज आयपीएलमधून बाहेर

हैदराबाद संघ गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर आयपीएल 11 मध्ये चार विजयासाह सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे मुंबईच्या सामन्याला मुकला होता. त्यात आणखी एका गोलंदाजाची भर पडली आहे. हैदराबद संघाचा मुख्य आधारस्तंभ असलेला बिली स्टॅनलके स्पर्धेतून बाद झाला आहे. बिली स्टॅनलकेच्या बोटाला दुखापत झाल्याने तो पुढील उपचारासाठी मायदेशी परतला आहे. 
पत्नीनेच दिली होती शिवसेना उपतालुका प्रमुखाच्या हत्येची सुपारी

पत्नीनेच दिली होती शिवसेना उपतालुका प्रमुखाच्या हत्येची सुपारी

शहापूर शिवसेना उपतालुका प्रमुख शैलेश नीमसे (45) यांच्या पत्नीनेच नातेवाईकांना सुपारी देऊन शैलेश यांची हत्‍या केल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. शैलेशच्या हत्येत सहभागी असलेल्‍या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्‍यात घेतले असून हत्‍येतील आणखी तीन आरोपी मात्र फरार आहेत. याप्रकरणी मृतकाची पत्नी मुख्य आरोपी साक्षी हिला पोलिसांनी अटक केली आहे. संपत्तीच्या वादातून तिने शैलेशची हत्या घडवून आणली होती.
चीनच्या 'त्या' महत्त्वकांक्षी प्रकल्पाला भारताचा परत नकार

चीनच्या 'त्या' महत्त्वकांक्षी प्रकल्पाला भारताचा परत नकार

चीनचा महत्त्वकांक्षी वन बेल्ट वन रोडच्या प्रकल्पाविषयी भारत आपल्या भूमिकेवर ठाम राहिला असून भारताने परत एकदा नकार दिला. शंघाय को-ऑपरेशन ऑर्गेनाइजेशन (SCO) च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सुषमा स्वराज्य यांनी भारत या प्रकल्पाचा भागीदार बनणार नसल्याचे सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा याच आठवड्यात चीन दौरा असून भारताच्या या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे.