Short News

अनुराग कश्यप करतोय स्वत:पेक्षा २२ वर्ष लहान मुलीबरोबर डेट

अनुराग कश्यप करतोय स्वत:पेक्षा २२ वर्ष लहान मुलीबरोबर डेट

कल्की कोच्लिनसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अनुराग कश्यप स्वत:पेक्षा अर्ध्या वयाच्या मुलीसोबत डेट करत आहे. दीर्घकाळापासून अनुरागच्या या रिलेशनशिपची चर्चा होत होती. पण अनुराग आत्तापर्यंत यावर मौन बाळगून होता. पण अखेर अनुरागने मौन सोडले असून पहिल्यांदा अनुराग आपल्या रिलेशनशिपवर बिनधास्तपणे बोलला आहे. अनुरागने पहिल्यांदा त्याच्या व शुभ्रा शेट्टीच्या रिलेशनशिपची गोष्ट कबुल केली आहे.
दीपिका पुन्हा रानी बनण्यासाठी सज्ज

दीपिका पुन्हा रानी बनण्यासाठी सज्ज

पद्मावतमध्ये महाराणी पद्मिनीची भूमिका साकारल्यानंतर दीपिका पुन्हा एकदा राणी बनण्यासाठी सज्ज झाली आहे. आता सपना दीदीच्या बायोपिकमध्ये दीपिका झळकणार आहे. या सिनेमाचे नाव रानी आहे. या सिनेमासाठी दीपिका जय्यद तयारी करत आहे. यात दीपिका एका डॉनची भूमिका साकारणार आहे.
'पीएनबी' अपहार प्रकरणात 'हनी ट्रॅप'चा वापर

'पीएनबी' अपहार प्रकरणात 'हनी ट्रॅप'चा वापर

पंजाब नॅशनल बँक अपहार प्रकरणात मुख्य आरोपी नीरव मोदी याची पत्नी एमी मोदी हिचीही भूमिका महत्त्वाची असल्याचं उघडकीस आलंय. पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाऱ्यांकडून गैरकारभार करुन घेण्यासाठी एमी मोदीनं 'हनी ट्रॅप'चा वापर केल्याची माहिती सूत्रांकडून समजतेय. यासाठी तिनं काही मॉडेल्सचीही मदत घेतल्याचं उघड झालंय.
डी. एस. कुलकर्णीला सात दिवसांची पोलीस कोठडी

डी. एस. कुलकर्णीला सात दिवसांची पोलीस कोठडी

पुणे सत्र न्यायालयाने प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने डीएसकेंना अटकेपासून दिलेले संरक्षण काल काढून घेतल्यानंतर आज पहाटे पुणे पोलिसांनी डीएसके व त्यांच्या पत्नीला दिल्लीतील हॉटेलमधून अटक केली. या दोघांनाही आता पुढचे सात दिवस कोठडीत काढावे लागणार आहेत.