Short News

उत्तर कोरियात ‘हे’ तीन भारतीय चित्रपट आहेत प्रचंड लोकप्रिय

उत्तर कोरियात ‘हे’ तीन भारतीय चित्रपट आहेत प्रचंड लोकप्रिय

उत्तर कोरियामध्ये भारताच्या राजदूतपदी मराठमोळा चेहरा सोलापूरचे अतुल गोतसुर्वे आहेत.का वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी तिथल्या संस्कृतीविषयी आणि भारतीय चित्रपटांविषयी तिथल्या लोकांना असणाऱ्या उत्सुकतेविषयी माहिती दिली. बॉलिवूडचे महानायक म्हणजेच अमिताभ बच्चन यांचा ‘बागबान' हा चित्रपट तिथे फार लोकप्रिय आहे. ‘दंगल' आणि ‘बाहुबली' हे चित्रपटसुद्धा तेथे प्रसिद्ध आहेत.
अमरनाथ यात्रा : 27 जूनला पहिला जथ्था रवाना होणार

अमरनाथ यात्रा : 27 जूनला पहिला जथ्था रवाना होणार

अमरनाथ यात्रेचे लगबग सुरू झाली आहे. आगामी 27 जूनला पहिला जत्था जम्मूच्या भगवतीनगर बेस कॅम्पपासून रवाना होईल. त्यानंतर 28 जूनला काश्मीरच्या पहेलगाम आणि बालटाल या दोन्ही कॅम्पपासून भक्तांना पाठवले जाईल. पहिल्यांदाच जम्मूच्या बेस कॅम्पमध्ये भक्तांसाठी एसी हॉल बनवण्यात आले आहेत. अमरनाथच्या दर्शनासाठी आता देशभरात वेगवेगळ्या बँकांच्या 440 शाखांमधून दोन लाखांपेक्षा जास्त भक्तांनी नोंदणी केली आहे. 
चहा विक्रेत्याची मुलगी बनली एअर फोर्समध्ये पायलट

चहा विक्रेत्याची मुलगी बनली एअर फोर्समध्ये पायलट

मध्यप्रदेशामधील एका चहा विक्रेत्याची मुलीने आपल्या नावासह वडिलांचे नाव मोठे केले आहे. आंचल गंगवाल असे या मुलीचे नाव असून ती आता भारतीय हवाई दलामध्ये लढाऊ पायलट बनण्यास सज्ज झाली आहे. मध्य प्रदेशातील प्रशासकीय परीक्षा पार करणारी आंचल ही एकमेव मुलगी आहे. ती आता फायटर पायलट म्हणून एअरफोर्समध्ये दाखल होणार आहे. हवाई दलांच्या बचाव कार्याने ती प्रेरित होत तिने हवाई दलात जाण्याचा निर्णय घेतला होता. 
पाकचा उद्दामपणा; उच्चायुक्तांना गुरुद्वारामध्ये प्रवेश नाकारला

पाकचा उद्दामपणा; उच्चायुक्तांना गुरुद्वारामध्ये प्रवेश नाकारला

पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना शनिवारी पाकिस्तान सरकारने रावळपिंडीजवळील गुरुद्वारामध्ये प्रवेश नाकारला. याप्रकरणी भारत सरकारने तीव्र संताप व्यक्त केला आहे.भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया हे त्यांच्या पत्नीसह रावळपिंडीनजीक हसन अब्दल येथे असलेल्या पंजा साहिब गुरुद्वारा येथे जात असताना त्यांना अडविण्यात आले. गुरुद्वारामध्ये जाण्यासाठी सर्व आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more