Short News

अनुष्कानंतर दीपिका पादुकोणही लवकरच देणार आनंदाची बातमी

अनुष्कानंतर दीपिका पादुकोणही लवकरच देणार आनंदाची बातमी

गेल्या काही दिवसांपासून दीपिका पादुकोण सतत तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. पण या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे दीपिकाने स्पष्ट केले आहे. पण तरीही या बातम्या थांबलेल्या नाहीत. आता मात्र दीपिकाबद्दल एक वेगळीच बातमी आहे. दीपिका सुद्धा अनुष्का शर्मा आणि प्रियांका चोप्राच्या पावलावर पाऊल ठेवत चाहत्यांना एक आनंदाची बातमी देणार आहे. दीपिका आपले स्वता:चे प्रॉडक्शन हाऊस खोलणार आहे. 
शाओमीचा मोबाईल विकत घ्या अन् पैसेही कमवा

शाओमीचा मोबाईल विकत घ्या अन् पैसेही कमवा

शाओमी कंपनीने आपल्या स्मार्टफोनवर नवीन ऑफर आणली आहे. तुम्ही जर शाओमीचा स्मार्टफोन घेत असाल तर तुम्ही भाग्यवान बनू शकता. आपल्या ग्राहकांना फायदा होण्यासाठी कंपनीने आपला बिझनेस मॉडल तयार केले आहे. यानुसार कंपनी आपल्या प्रोडक्ट्सवर होणाऱ्या प्रोफिट मार्जिन चे प्रमाण तयार केले आहे. म्हणजे शाओमी फक्त ठरवलेला नफाच आपल्याकडे ठेवणार असून बाकी नफा ग्राहकांना परत देणार आहे.
Gionee भारतात लॉन्च केला S11 Lite आणि F205 स्मार्टफोन

Gionee भारतात लॉन्च केला S11 Lite आणि F205 स्मार्टफोन

चायना कंपनी जिओनी Gionee ने 2018 वर्षात आपला स्मार्टफोन Gionee S11 Lite आणि F205 ला लॉन्च केले आहे. कंपनीचे दोन्ही स्मार्टफोन फूल व्ह्यू डिस्प्ले दिले आहेत. 18.9च्या एस्पेक्ट रेश्यो मध्ये येत आहे. कंपनीने मागील वर्षात हे दोन्ही फोन्स चीनमध्ये लॉन्च केले होते. Gionee S11 Lite आणि F205ची किंमत अनुक्रमे 13,999 रुपये आणि 8,999 रुपये आहे. S11 Lite काळ्या,सोनेरी गर्द निळ्या रंगात उपलब्ध असणार आहे. 
शुटिंग संपताच 'गली बॉय' रणवीर गेला सुट्टीवर

शुटिंग संपताच 'गली बॉय' रणवीर गेला सुट्टीवर

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंगने नुकतेच 'गली बॉय'चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. शूटिंग पूर्ण होताच रणवीर सिंग ब्रेक घेऊन व्हेकेशनवर गेला आहे. रणवीर सिंगने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताच रणवीरच्या फॅन्सनी त्याला कुठे चलला फिरायला असे प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. रणवीर आपल्या आवडत्या देशात स्वित्झर्लंडला गेला आहे.