Short News

'सेक्रेड गेम्स' सिरीज वादाच्या भोवऱ्यात

'सेक्रेड गेम्स' सिरीज वादाच्या भोवऱ्यात

'सेक्रेड गेम्स' ही सिरीज सध्या भरपूर चर्चेत आहे. ही सिरीज लिक झाल्यामुळे सोशल मीडियावर याचे असंख्य क्लिप्स व्हायरल होत आहेत. यामुळे यावर आता अगदी मोकळेपणाने चर्चा होत आहे. 'सेक्रेड गेम्स' यामधील काही दृश्यांमुळे ही सिरीज अधिक व्हायरल झाली. असं असताना ही दृश्य हटवण्याची मागणीवर याचिका दाखल करण्यात आली होती.वेब सिरीजमध्ये काही ठिकाणी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा अपमान केला आहे.
निधी आणि राहुलचे  लंडनमधले फोटो व्हायरल

निधी आणि राहुलचे लंडनमधले फोटो व्हायरल

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज लोकेश राहुल आणि अभिनेत्री निधी अग्रवाल यांना एकत्र पाहिलं गेलं होतं. त्यांच्या भेटीचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. मात्र त्यानंतरही हे जोडपं अनेक वेळा एकत्र दिसून आलं होतं. मात्र सध्या त्यांच्या लंडन भेटीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून हे दोघं लंडनमध्ये त्यांच्या क्वालिटी टाईम व्यतीत करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 
गिर्यारोहकांनी शोधले 50 वर्षांपूर्वी विमान अपघातात शहीद झालेल्या जवानांचे मृतदेह

गिर्यारोहकांनी शोधले 50 वर्षांपूर्वी विमान अपघातात शहीद झालेल्या जवानांचे मृतदेह

50 वर्षांपूर्वी झालेल्या एका भीषण विमान अपघातात शहीद झालेल्या जवानांचे मृतदेह गिर्यारोहकांनी शोधून काढले आहेत. 1968 साली हिमाचल प्रदेशमधील लाहोल येथील पर्वतरांगांमध्ये भारतीय हवाई दलाचे एएन-12 हे विमान अपघातग्रस्त झाले होते. चंदीगड येथून लेह येथे जात असलेल्या या विमानातून सुमारे 102 जण प्रवास करत होते. 
पाच वर्षाच्या चिमुरड्याने पटवली आईच्या मृतदेहाची ओळख

पाच वर्षाच्या चिमुरड्याने पटवली आईच्या मृतदेहाची ओळख

वांद्रे स्थानकात गुरुवारी संध्याकाळी एका महिलेचा लोकलखाली आल्यानं मृत्यू झाला होता. तब्बल १७ तासानंतर पोलिसांना महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात यश मिळालं. महिलेचा पाच वर्षाचा मुलगाही अपघातात जखमी झाला होता. आश्चर्यकारकरित्या या अपघातातून तो बचावला होता. उपचारादरम्यान चिमुरडा बोरिवली...बोरिवली असं ओरडू लागला आणि पोलिसांना ओळख पटवण्यात मदत झाली. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more