Short News

गोंदियात गारपिटीच्या माऱ्याने 460 पोपटांनी प्राण गमावले

गोंदियात गारपिटीच्या माऱ्याने 460 पोपटांनी प्राण गमावले

भंडारा जिल्ह्यात गारांसह अवकाळी पाऊस झाल्यामुळे 460 पोपटांना जीव गमवावा लागला. तुमसर तालुक्यातील शिव मंदिराजवळ काल रात्री ही घटना घडली. गेल्या अनेक वर्षांपासून तुमसर शहरातील शिव मंदिराजवळ पिंपळाच्या झाडांवर हजारो पोपटांचं वास्तव्य होतं. वर्षानुवर्ष या पोपटांनी अनेक उन्हाळे-पावसाळे झेलले.
सेन्सेक्स अन् निफ्टीत घसरण , बॅँकांतील गुंतवणूक कमी

सेन्सेक्स अन् निफ्टीत घसरण , बॅँकांतील गुंतवणूक कमी

भारतीय शेअर बाजारात सुरुवातीला वाढ दिसली.पण सरकारी बँकांमधील शेअर्सची विक्रीत वाढली. धातू,ऑटो,फएमसीजी,आयटी,मीडिया,फार्मा आणि रिअल्टी गुंतवणुकीत कमतरता जाणवली. सर्व बाजूंनी शेअर्समध्ये घसरण झाल्याने सेन्सेक्स ४०६ अंकांनी खाली आला. तर निफ्टचीही १०,४०० अंकांनी घसरण झाली. बाजार सुरू झाला होता तेव्हा सेन्सेक्स ४३ अंकांनी वाढत ३४,०५४ सुरू झाला. तर निफ्टीही ३७ अंकांनी वधारला होता. 
वयाच्या ३६व्या वर्षी रॉजर फेडरर ठरला जगातील क्रमांक एकचा खेळाडू

वयाच्या ३६व्या वर्षी रॉजर फेडरर ठरला जगातील क्रमांक एकचा खेळाडू

स्वित्झरलॅंडचा आंतरराष्ट्रीय टेनिसपटू रॉजर फेडररने यंदाचा पहिल्या ग्रॅंड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये बाजी मारली. या कामगिरीमुळे तो जगातील क्रमांक एकचा खेळाडू ठरला आहे. तसेच, जगातील सर्वाधीक वयस्कर टेनिसपटू ठरण्याचा मानही त्याला मिळाला आहे. ३६ वर्षीय फेडररने रोटरडम ओपनच्या क्वार्टरफायनलमध्ये हॉलंडच्या रॉबिन हासेला ४-६, ६-१, ६-१ अशा फरकाने पराभूत केले.
हायपरलूपने मुंबई पुण्याचे अंतर होणार कमी

हायपरलूपने मुंबई पुण्याचे अंतर होणार कमी

जगातील पहिली हायपरलूप मुंबई ते पुणेदरम्यान धावणार आहे. तसे झाल्यास दोन्ही शहरांतील १५० किमीचे अंतर फक्त १४ ते २५ मिनिटांत कापले जाणार आहे. सध्या हे अंतर गाठण्यासाठी तीन तास लागतात. रविवारी व्हर्जिन ग्रुप आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने मुंबई-पुणे हायपरलूप ट्रान्सपोर्टेशन सिस्टिमला जोडण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.