Short News

इम्तियाज घेऊन येत आहे नव्या अंदाजातील ‘लैला मजनू'

इम्तियाज घेऊन येत आहे नव्या अंदाजातील ‘लैला मजनू'

प्रेमकथा रुपेरी पडद्यावर प्रभावीपणे मांडणारा दिग्दर्शक म्हणून इम्तियाज अली आता लैला मजनूची प्रेमकथा एका नव्या ढंगात प्रेक्षकांसमोर आणत आहे. यासाठी त्याने एकता कपूरशी हातमिळवणी केली आहे. एकता कपूरच्या ‘बालाजी मोशन पिक्चर्स' अंतर्गत येणाऱ्या आगामी ‘लैला मजनू' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये तृप्ती दिमरी आणि अविनाश तिवारी यांच्या मुख्य भूमिका आहेत. 
टाटा स्कायही उतरले ब्रॉडबँडच्या मैदानात

टाटा स्कायही उतरले ब्रॉडबँडच्या मैदानात

रिलायन्स जिओच्या गीगाफायबरच्या आधीच देशाला डीटीएच सुविधेने व्यापलेली कंपनी टाटा स्काय ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा देणार आहे. प्रारंभी देशातील महत्वाच्या 12 शहरांमध्ये ब्रॉडबँड सेवा पुरविणार आहे. या कंपनीचे प्लॅन्स एक, तीन, पाच, नऊ ते 12 महिन्यांच्या मुदतीचे आहेत.  एक महिन्याच्या अनलिमिटेड इंटरनेट प्लॅनसाठी 999 रुपये मोजावे लागणार आहेत. या प्लॅनमध्ये 5 एमबीपीएस एवढा वेग मिळणार आहे.   
चंद्रपूर जिल्ह्यात पाचव्यांदा फडकला भगवा झेंडा

चंद्रपूर जिल्ह्यात पाचव्यांदा फडकला भगवा झेंडा

चंद्रपूर जिल्ह्याच्या असलेल्या भद्रावती नगर परिषदेवर शिवसेनेने आपला भगवा झेंडा फडकवला आहे. नगराध्यक्ष पदासह पूर्ण बहुमत मिळवले आहे, गेल्या 20 वर्षापासून सत्तेत असलेल्या शिवसेनेला पुन्हा एकदा मतदारांनी भरभरून मतदान केले आहे. 27 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने 16 जागा मिळवत पूर्ण बहुमत प्राप्त केले. भाजपला अवघ्या चार जागा मिळाल्या आहेत. 
इंग्लंडविरुद्ध विराट कोहलीचे शतक; भारताकडे 449 धावांची आघाडी

इंग्लंडविरुद्ध विराट कोहलीचे शतक; भारताकडे 449 धावांची आघाडी

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीत भारताकडे दुसऱ्या डावात भक्कम आघाडी उभी केली आहे. कर्णधार विराट कोहलीने शानदार शतक ठोकत भारताचा डाव सावरला आहे. कोहलीचे कसोटीतील 23 वे शतक असून कर्णधार म्हणून त्याचे कसोटीतले 16 वे शतक आहे. सध्या भारताची धावसंख्या 4 बाद 281 झाली आहे.शतक करून कोहली 103 धावांवर बाद झाला तर चेतेश्वर पुजाराने 72 धावा करत त्याला चांगली साथ दिली.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more