Short News

सुपरस्टार रजनीकांतच्या 'काला’ चित्रपटातील स्टंट सीन लीक

सुपरस्टार रजनीकांतच्या 'काला’ चित्रपटातील स्टंट सीन लीक

सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी ‘काला' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख नुकतीच जाहीर करण्यात आली. रजनीकांत यांचा जावई आणि ‘काला'चा निर्माता धनुष याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंबंधीची माहिती दिली. परंतु सोशल मीडियावर या चित्रपटातील एक स्टंट सीन व्हायरल झाला आहे. हा सीन चित्रपटातील क्लायमॅक्स सीन असल्याचे तर्क लावण्यात येत आहे. 
अॅक्शनपॅक 'बागी 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/F2lN25IayH8" frameborder="0" allow="autoplay; encrypted-media" allowfullscreen></iframe>

अॅक्शनपॅक 'बागी 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानीचा अॅक्शनपॅक 'बागी 2' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ हा पुन्हा एकदा एक जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान हा करणार आहे. 30 मार्चला हा चित्रपट रिलीज होणार आहे. 
कमल हसनकडून‘मक्कल निधी मय्यम’ पक्षाची घोषणा

कमल हसनकडून‘मक्कल निधी मय्यम’ पक्षाची घोषणा

कमल हसनने तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केला आहे. मदुराईच्या ओथाकडाई मैदानात आपल्या लाखो पाठीराख्यांच्या साक्षीने कमल हसनने आपल्या नवीन पक्षाची घोषणा केली. कमल हसनच्या नवीन पक्षाचं नाव ‘मक्कल निधी मय्यम' असं आहे. आजच्या सभेदरम्यान कमल हसनने आपल्या पक्षाच्या राजकीय चिन्हाचंही अनावरण केलं. एका ताऱ्याभोवती सहा हातांनी केलेली गुंफण असं हसन यांच्या नवीन पक्षांचं चिन्ह असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचे नाणेफक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय

दक्षिण आफ्रिकेचे नाणेफक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले आहे. फॉर्मात असलेला भारतीय संघ या आंतरराष्ट्रीय सामन्यात विजयी आघाडी घेण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. यजमान संघ मालिकेतील आव्हान कायम राखण्यास प्रयत्नशील असल्यामुळे टीम इंडियाला गाफिल राहता येणार नाही.