Short News

सारा अली खानच्या 'केदारनाथ' वर नवे विघ्न ; थांबले चित्रपटाचे शूटिंग

सारा अली खानच्या 'केदारनाथ' वर नवे विघ्न ; थांबले चित्रपटाचे शूटिंग

सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिचा बॉलिवूड डेब्यू अडचणीत आला आहे. ‘केदारनाथ'चे निर्माते आणि दिग्दर्शक अभिषेक कपूर यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. हा वाद आता विकोपाला पोहोचल्याची माहिती मिळाली आहे. या वादामुळेच ‘केदारनाथ'चे शूटींग रोखण्यात आले आहे. या वादाची सुरूवात ‘केदारनाथ'च्या रिलीज डेटपासून झाली होती.
टी20 लीग: हिटमॅनचा संघ भिडणार हैदराबादशी

टी20 लीग: हिटमॅनचा संघ भिडणार हैदराबादशी

वारंवार पराभवाचा सामना करणाऱ्या गतविजेत्या मुंबईचा संघ आज घरच्या मैदानावर हैदराबादला टक्कर देणार आहे. पहिले तीन सामने गमावल्यानंतर मुंबईकरांनी चौथ्या सामन्यात आरसीबीला नमविले. मात्र रविवारी झालेल्या राजस्थानशी झालेल्या सामन्यात मुंबईला पुन्हा पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान आता मुंबईचे 9 सामने शिल्लक राहिले असून, अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळविण्यासठी मुंबईला किमान 7 सामने जिंकावे लागतील. 
पुढील काही वर्षात भारत क्रिकेट जगतावर राज करेल - मायकेल क्लार्क

पुढील काही वर्षात भारत क्रिकेट जगतावर राज करेल - मायकेल क्लार्क

सक्षम दुसरी फळी सज्ज असल्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ जगातील विविध वातावरणात यश मिळवीत आहेत. त्यामुळे पुढील 5 ते 10 वर्षे ते क्रिकेटजगतावर सहजपणे वर्चस्व गाजवतील, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने व्यक्त केला. बोरिया मजुमदार लिखित ‘इलेव्हन गॉड्स अ‍ॅण्ड ए बिलियन इंडियन्स' या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाला मायकेल क्लार्कने हजेरी लावली होती.
एन्काऊंटरनंतर जवानांनी धरला सपना चौधरीच्या गाण्यावर ठेका

एन्काऊंटरनंतर जवानांनी धरला सपना चौधरीच्या गाण्यावर ठेका

महाराष्ट्रात जवळपास 40 वर्षांनंतर नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलाने सर्वात मोठी कारवाई केली आहे. रविवारी गडचिरोली जिल्ह्यात जवळपास 16 नक्षलवाद्यांना ठार केले तर काहींचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. यात काही उच्चपदस्थ कमांडर आणि महिला नक्षलींचा समावेश आहे. या एन्काऊंटरनंतर जवानांनीही मोठा जल्लोष केला. जवानांनी सपना चौधरीच्या गाण्यावर ठेका धरला आहे.