Short News

'लव्हरात्री'चा टीझर सलमानकडून लाँच

'लव्हरात्री'चा टीझर सलमानकडून लाँच

सलमान खानने 'लव्हरात्री' चित्रपटाचा टीझर ट्विटरवर शेअर केला आहे. या सिनेमातून सलमान मेहुणा आयुष शर्माला बॉलिवूडमध्ये लाँच करत आहे, तर अभिनेत्री वरिना हुसैन त्याच्यासोबत पदार्पण करत आहे. इंग्रजी, गुजराती, उर्दू आणि हिंदी अशा चार भाषांमध्ये ट्वीट करत सलमानने टीझर शेअर केला आहे. '#LoveratriTeaser' सोबत प्रेमाच्या रंगात रंगून जाण्यास सलमान चाहत्यांना सांगत आहे.
नॉर्मल डिलिव्हरीसाठी खास '३' योगासने!

नॉर्मल डिलिव्हरीसाठी खास '३' योगासने!

आजकाल नॉर्मल डिलिव्हरी झाल्याचे खूप कमी ऐकू येते. बदललेली जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या अयोग्य वेळा व सवयी यामुळे महिलांचे नॉर्मल डिलिव्हरची शक्यता कमी झाली आहे. पण योगसाधनेच्या मदतीने नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता वाढवता येईल. त्यासाठी ही आसने करणे फायदेशीर ठरेल. वक्रासन, उत्कटासन आणि कोनासन केल्याने नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता वाढवता येते.
आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी रेखा बँकॉकमध्ये दाखल

आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी रेखा बँकॉकमध्ये दाखल

आयफा पुरस्कार सोहळा जवळ येऊन ठेपला असतानाच यंदाचा हा सोहळा चांगलाच गाजणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या सोहळ्याबद्दल प्रत्येक कलाकाराच्या मनात उत्सुकता असून कलाकारांची पावले हळूहळू बँकॉकच्या दिशेने वळू लागलीत. त्यातच आता आणखी एक अभिनेत्री नुकतीच बॅकॉकला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांची. रेखा या तब्बल २० वर्षानंतर आयफाच्या व्यासपीठावर परफॉर्म करणार.
हॉकीः भारताने पाकिस्तानचा ४-०ने उडवला धुव्वा

हॉकीः भारताने पाकिस्तानचा ४-०ने उडवला धुव्वा

चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. भारताने पाकिस्तानवर ४-०ने मात धुळ चारली. रमनदीप सिंह, दिलप्रीत सिंह, मंदीप सिंह आणि ललित उपाध्याय यांनी प्रत्येकी एक-एक गोल केले. सामन्याच्या सुरुवातीला भारताने पाकिस्तानवर पहिला गोल केला. यानंतर सामन्याच्या उत्तरार्धात भारतीय संघाने आक्रमक खेळी केली. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more