आजपासून बिग बॉस बोलणार मराठीतून
मनोरंजन
- 5 days ago
आजपासून मराठीतील बिग बॉसच्या सिजनची सुरुवात होणार आहे. कलर्स मराठीवर मराठी बिग बॉस हा रिअलिटी शो दाखवण्यात येणार आहे. मराठीतील दिग्गज कलाकार आणि सेलिब्रेटींची वर्णी बिग बॉसच्या घरात लागले आहेत. प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर बिग बॉसचं सूत्रसंचालन करणार आहेत. सोमवार ते शनिवार दररोज रात्री साडेनऊ वाजता मराठी बिग बॉसचे प्रक्षेपण कलर्स मराठीवर करण्यात येईल.