Short News

अखेर 27 एप्रिलला 'न्यूड' होणार प्रदर्शित

अखेर 27 एप्रिलला 'न्यूड' होणार प्रदर्शित

गोव्यातल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून वगळण्यात आल्याने चर्चेत राहिलेला 'न्यूड' हा मराठी सिनेमा येत्या 27 एप्रिलला प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचे नाव आणि त्याच्या विषयावरून त्याची खूप चर्चा होत होती. याचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. 'न्यूड'च्या प्रदर्शनाविषयी जाहीर झाल्यानंतर या सिनेमाच्या कॉपीराइट्स हक्कांवरुन पुन्हा एकदा वाद निर्माण झाला होता. 
'राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात लैंगिक सुखाला पंसती असतेच'

'राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात लैंगिक सुखाला पंसती असतेच'

कोरिओग्राफर सरोज खान आणि काँग्रेस नेत्या रेणुका चौधरीनंतर भाजप नेते अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आता कास्टिंग काउचवर भाष्य केले आहे. सरोज खान आणि रेणुका चौधरी या दोन्ही चुकीच्या नाहीत. कास्टिंग काउचचा प्रकार मनोरंजन आणि राजकरणात होतच असतात. कामाच्या मोबदल्यात लैंगिक सुख मागणे हे पुर्वीपासून चालू असल्याचे म्हणत  शत्रुघ्न सिन्हा यांनी रेणुका चौधरी आणि सरोज खान यांच्या वक्तव्याची पाठराखण केली.     
आसाराम बापूच्या शिक्षेवर राखी सावंतने उपस्थित केला प्रश्न

आसाराम बापूच्या शिक्षेवर राखी सावंतने उपस्थित केला प्रश्न

आसाराम बापूला बलात्काराच्या गुन्ह्याबद्दल शिक्षा ठोठावण्यात आली आहे. याचे अभिनेत्री राखी सावंत हिने स्वागत केले आहे. मात्र त्याला आजन्म कारावासच का? मृत्यूदंड का नाही,असा सवाल राखीने केला आहे. आपण श्रीमंत असल्यामुळे आपले कोणीही बिघडू शकत नाही, अशा मानसिकतेने मुली आणि महिलांचे लैंगिक शोषण करण्यांना हा चांगलाच धडा असल्याचे राखी म्हणाली. पण असारामला मृत्यूदंड दिला हवा होता असेही ती म्हणाली आहे.
भगव्या कुर्तामधील फोटोमुळे गेलची इन्टाग्रामवर धूम

भगव्या कुर्तामधील फोटोमुळे गेलची इन्टाग्रामवर धूम

आपल्या फलंदाजीने क्रिस गेलने सर्वांनाच हैराण केले आहे. तो पहिल्यांदा पंजाब संघाकडून खेळत आहे. आयपीएलच्या लिलावात अखेरच्या क्षणी प्रीती झिंटाने त्याला बेस प्राईजवर खरेदी केले. प्रीतीचा हा निर्णय गेलने खरा करुन दाखवला. सध्या गेलचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. गेलने देसी लूक असलेला फोटो शेअर केला आहे. यात गेल कुर्ता पायजमा घातलेला दिसत आहे. त्याच्यावर हा कुर्ता शोभून दिसत आहे.