Short News

बिग बॉसच्या घरात आज मेघा, पुष्कर आणि भूषणला आज काय मिळणार सरप्राईझ ?

बिग बॉसच्या घरात आज मेघा, पुष्कर आणि भूषणला आज काय मिळणार सरप्राईझ ?

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी सदस्यांवर फ्रीझ - रिलीझ हे साप्ताहिक कार्य सोपावले. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये भूषणचा मुलगा त्याची भेट घेण्यासाठी येणार आहे. तसेच मेघाची आई आणि मुलगी साक्षी येणार आहेत. सगळ्यात मोठं सरप्राईझ पुष्करला मिळणार आहे कारण त्याच्या बायको सोबतच त्याची चिमुकली मुलगी देखील या घरामध्ये येणार आहे.
दिल्लीतील प्रदूषणाची पातळी गंभीर

दिल्लीतील प्रदूषणाची पातळी गंभीर

दिल्लीतील हवा प्रदूषणाची पातळी कमी झाली असली तरी लागोपाठ पाचव्या दिवशी ती गंभीर आहे. प्रदूषके पसरली गेल्याने हवेतील प्रदूषण कमी होण्याची शक्यता आहे. प्रदूषणाची पातळी लागोपाठ चार दिवस ही ‘अतिशय गंभीर' होती ती आता ‘गंभीर' पातळीपर्यंत खाली आली आहे. सेंटर ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रीसर्च इन्स्टिटय़ूट म्हणजेच सफर या संस्थेने असे म्हटले आहे, की प्रदूषणाची पातळी कमी होण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा बरसायला सुरुवात केली आहे. शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. आज रविवारीही पावसाच्या सरी कोसळत आहेत. या सरींमुळे बळीराजा सुखावून गेला आहे. तळकोकणात मान्सून आल्यानंतर सुरुवातीचे 4 दिवस जिल्ह्यातील जनजीवन अक्षरश: विस्कळीत झाले होते. महामार्गासह सर्वच नदी, नाले दुथडी भरून वाहत होते. 
रेल्वेत लागणार व्हॅक्यूम बायो टॉयलेट - पीयूष गोयल

रेल्वेत लागणार व्हॅक्यूम बायो टॉयलेट - पीयूष गोयल

रेल्वेत बायो टॉयलेट लावण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. पण आता या टॉयलेट्सला व्हॅक्यूम बायो टॉयलेटमध्ये परिवर्तित करण्याची तयारी सुरू आहे. यासंदर्भातील ट्रायल सुद्धा घेतल्या जात आहेत. सध्या 500 व्हॅक्यूम बायो टॉयलेटची ऑर्डर देण्यात आली आहे. प्रयोग यशस्वी ठरल्यास रेल्वेंमध्ये लागलेले सर्वच टॉयलेट बदलले जाणार आहेत. या विशिष्ट अशा टॉयलेटच्या एका युनिटची किंमत लाखांमध्ये आहे. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more