Short News

भिडेंच्या 'आम्रसूत्रा'वर राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून निशाणा

भिडेंच्या 'आम्रसूत्रा'वर राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून निशाणा

माझ्या शेतामधील आंबा खाल्ल्याने जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, या संभाजी भिडेंच्या विधानावर आता राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या व्यंगचित्रात दोन महिला दाखवल्या आहेत. एका महिलेच्या बाळ हातात दाखवले. या बाळाच्या चेहऱ्याऐवजी राज यांनी आंबा दाखवला आहे. या बाळाला पाहून दुसरी महिला 'अय्या ! भिडेंच्या बागेतून वाटतं,'असं म्हणत असल्याचं व्यंगचित्र राज यांनी रेखाटलं.
आतापर्यंत सातवेळा लागली जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट

आतापर्यंत सातवेळा लागली जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट

भाजपने जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक घेऊन हा निर्णय घेतला. राज्यपाल राजवट लागू करायला हवी,अशी मागणीही केली. यापूर्वीही अनेकवेळा येथे राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 7वेळा राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. 
राहुल गांधींना बाल हक्क आयोगाची नोटीस

राहुल गांधींना बाल हक्क आयोगाची नोटीस

महाराष्ट्र बाल हक्क आयोगाने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. जामनेर तालुक्यातील वाकडी येथे विहिरीत पोहायला गेलेल्या मुलांना नग्न करून त्यांना मारहाण केल्याचे प्रकरण देशभर गाजत आहे. या घटनेसंदर्भात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटर वर भाष्य करून एक व्हिडिओही ट्विटरवर अपलोड केला होता.
इंग्लंडने वनडे क्रिकेटमध्ये रचला सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम

इंग्लंडने वनडे क्रिकेटमध्ये रचला सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम

इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावांच्या विश्वविक्रमाला गवसणी घातली. इंग्लंडने या सामन्यात निर्धारीत 50 षटकांत 6 बाद 481 अशी विश्वविक्रमी धावसंख्या उभारली. यापूर्वी सर्वाधिक धावांचा विक्रम हा श्रीलंकेच्या नावावर होता. श्रीलंकेने नेदरलँड्सविरुद्ध 443 धावा करत विश्वविक्रम रचला होता. इंग्लंडच्या जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टोव्ह यांनी 159 धावांची दमदार सलामी दिली.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more