Short News

आलिया भट्टनंतर रणबीरनेही केले लोकांसोबत श्रमदान

आलिया भट्टनंतर रणबीरनेही केले लोकांसोबत श्रमदान

अभिनेता संजय दत्तच्या ‘संजू' या बायोपिकमुळे प्रचंड चर्चेत असलेला रणबीर कपूर सध्या त्याच्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. रणबीरने अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून बॉलिवूडचा परफेक्टनिस्ट अमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांच्यासोबत श्रमदान केले. कामगार दिनानिमित्त अभिनेत्री आलिया भट्टनेदेखील अमीरसोबत श्रमदान केले होते. 
कोलकात्याचा राजस्थानवर 25 धावांनी विजय

कोलकात्याचा राजस्थानवर 25 धावांनी विजय

कोलकात्याने आज राजस्थानवर 25 धावांनी विजय प्राप्त करत थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. कोलकात्याने दिलेले 170 धावाच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान 20 षटकात केवळ 144 धावाच करू शकले. राजस्थानकडून संजु सॅमसन (50) आणि कर्णधार रहाणे (46) यांनी चांगली खेळी केली पण विजय प्राप्त करण्यात अपयश आले. पियूष चावलाने 4 षटकांत 24 धावा देत 2 बळी बाद केले.
कोलकात्याचे राजस्थानपुढे 170 धावांचे आव्हान

कोलकात्याचे राजस्थानपुढे 170 धावांचे आव्हान

कोलकाताने निर्धारीत 20 षटकांत 169 धावा करत राजस्थानसमोर 170 धावांचे आव्हान ठेवले आहे. राजस्थानकडून कर्णधार दिनेश कार्तिकने 38 चेंडूत 4 चौकार 2 षटकाराच्या जोरावर 52 धावा केल्या तर आंद्रे रसेलने 25 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीने 49 धावा करत नाबाद राहिला. राजस्थानकडून क्रिष्णापा गौतमने 3 षटकांत 15 धावा देत 2 गडी बाद केले.
मंत्रीमंडळाच्या बैठकीत पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत दिलासा नाही

मंत्रीमंडळाच्या बैठकीत पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत दिलासा नाही

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पेट्रोल-डिझेलची वाढती दरवाढ रोखण्याबाबत निर्णय होईल अशी आशा होती. मात्र, ही आशा फोल ठरली असून इंधन दरवाढीबाबत बैठकीत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. उलट, पेट्रोलिअम उत्पादनातून मिळणाऱ्या अबकारी कराचा वापर महामार्ग आणि एम्ससारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रुग्णालयांच्या निर्मितीसाठी करण्यात येतो.