Short News

कोट्यवधी रुपये नाकारत रणवीरने त्या कार्यक्रमास जाण्यास दिला नकार

कोट्यवधी रुपये नाकारत रणवीरने त्या कार्यक्रमास जाण्यास दिला नकार

झोया अख्तरच्या ‘गल्ली बॉय' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी रणवीर जास्तीत जास्त वेळ देत असून, या चित्रपटासाठी त्याने एका कार्यक्रमात जाण्यास नकार दिला आहे. एका लग्नात अर्ध्या तास उपस्थित राहण्यासाठी रणवीरला २ कोटी रुपये देण्यात येणार होते. पण, ‘गल्ली बॉय'मुळे त्याने हा प्रस्ताव नाकारला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट टी२० शिवाय पुढे जाऊ शकत नाही - गांगुली

आंतरराष्ट्रीय क्रिकेट टी२० शिवाय पुढे जाऊ शकत नाही - गांगुली

क्रिकेटविश्वात टी-२० ला सध्याच्या घडीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. टी-२० मुळे क्रिकेट हा खेळ अधिकच प्रसिद्ध झाला असून, प्रेक्षकही खूप मोठ्या संख्येने या खेळाचा आनंद घेताना दिसतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आता टी-२० शिवाय पुढे जाऊ शकत नाही, असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले. युवा खेळाडूंची कामगिरी खूपच प्रभावी होत असल्याचे गांगुली म्हणाला. 
'झिरो' ठरला श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट

'झिरो' ठरला श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट

बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार श्रीदेवी यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले. वयाच्या चौथ्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या श्रीदेवी यांनी गेल्याच वर्षी चित्रपट कारकीर्दीचा सुवर्ण महोत्सव पूर्ण केला. शाहरुख खानच्या आगामी 'झिरो' चित्रपटात श्रीदेवींचे अखेरचे दर्शन होणार आहे. मॉम हा श्रीदेवी यांच्या कारकीर्दीतला ३०० वा सिनेमा होता. झिरो सिनेमा हा ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. 
केपटाऊन विजय:  रैना सामनावीर तर भुवनेश्वर ठरला मालिकावीर

केपटाऊन विजय: रैना सामनावीर तर भुवनेश्वर ठरला मालिकावीर

केपटाऊनच्या ट्वेन्टी२० सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी रोमांचक विजय मिळवला. भारताने या विजयासह तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. भुवनेश्वरने चार षटकांत केवळ २४ धावा देऊन २ फलंदाजांना माघारी धाडले. या संपूर्ण मालिकेत भुवनेश्वराच्या कामिगीरीमुळे त्याला मालिकावीर घोषित केले. तर ४३ धावांची दमदार खेळी करणाऱ्या सुरेश रैनाला सामनावीर घोषित करण्यात आले.