Short News

पहा अक्षय कुमारच्या पॅडमनने पाच दिवसात किती कमावले

पहा अक्षय कुमारच्या पॅडमनने पाच दिवसात किती कमावले

अक्षय कुमारच्या 'पॅडमॅन'ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. गेल्या दोन दिवसातही या सिनेमाने चांगला गल्ला जमवला आहे. वेगळ्या धाटणीच्या या सिनेमाला समीक्षकांनीही पसंती दिली आहे. या सिनेमाने गेल्या पाच दिवसात 50 कोटींचा आकडा पार केला आहे. मार्केट अॅनालिस्ट तरण आदर्शने या सिनेमाच्या कमाईचे आकडे सोशल मीडियावर जारी केले आहेत.
हिट अॅण्ड रन : सलमानला दिलासा, अजामीनपात्र वॉरन्ट रद्द

हिट अॅण्ड रन : सलमानला दिलासा, अजामीनपात्र वॉरन्ट रद्द

मुंबई सत्र न्यायालयाने अभिनेता सलमान खानला दिलासा दिला आहे. शनिवारी मुंबई सत्र न्यायालयाने 2002 च्या हिट अॅण्ड रन प्रकरणातील सलमानच्या विरोधाताली अजामीनपात्र वॉरन्ट रद्द केला आहे. 2002 च्या हिट अॅण्ड रन प्रकरणात सलमानविरोधात अजामीनपात्र वॉरन्ट जारी करण्यात आला होता. काही दिवसापुर्वी जोधपूर न्यायालयाने काळवीट शिकारप्रकरणी शिक्षा सुनावली. त्यानंतर जामीनही मंजूर केला.
सोनम -आनंदच्या संगीत कार्यक्रमात करण जोहर लावणार ठुमके

सोनम -आनंदच्या संगीत कार्यक्रमात करण जोहर लावणार ठुमके

सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांच्या लग्नाची तयारी सध्या जोरात सुरु आहे. मे महिन्यात दोघे लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. फराह खान लग्नाच्या संगीत सेरेमनीची तयारी करते आहे. फराह खान या संगीत कार्यक्रमाची कोरियोग्राफी करते आहे. तर या कार्यक्रमाच्या पाहुण्याच्या यादीत करण जोहरेचे नावदेखील सामिल आहे. त्यामुळे सध्या करण सोनमच्या संगीत कार्यक्रमात परफॉर्मे करण्याची तयारीला लागला आहे.
फरार आर्थिक गुन्हेगारांची संपत्ती होणार जप्त, अध्यादेश मंजूर

फरार आर्थिक गुन्हेगारांची संपत्ती होणार जप्त, अध्यादेश मंजूर

आर्थिक गुन्हे करून देश सोडून पळून जाणाऱ्या गुन्हेगारांची संपत्ती जप्ती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतच्या अध्यादेशास मंजुरी मिळाली आहे. राष्ट्रपतींच्या सहमतीनंतर यावर शिक्कामोर्तब होणार आहे. लोकसभेत 12मार्चला 'फरार आर्थिक गुन्हेगार विधेयक २०१८'हा अध्यादेश सादर केला होता.