Short News

'व्हायरल गर्ल'चे आईवडील नाराज, सोडावे लागले घर

'व्हायरल गर्ल'चे आईवडील नाराज, सोडावे लागले घर

सध्या सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा चालेली ती उरु अदार लव्ह या मल्याळम चित्रपटाची अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियरची. एका रात्रीत झालेली स्टार इंटरनेटवर तिच्या व्हिडिओने सर्वांना घायाळ केले आहे. व्हॅलेन्टाईन वीकमध्ये व्हायरल झालेल्या या व्हिडिओने प्रियाला जगातील तिसरी सर्वाधिक लोकप्रिय इन्स्टाग्राम सेलिब्रिटी बनवले आहे. मात्र, प्रियाला या मिळालेल्या प्रसिद्धीचा तिच्या आईवडिलांना फार त्रास होत आहे.
वयाच्या ३६व्या वर्षी रॉजर फेडरर ठरला जगातील क्रमांक एकचा खेळाडू

वयाच्या ३६व्या वर्षी रॉजर फेडरर ठरला जगातील क्रमांक एकचा खेळाडू

स्वित्झरलॅंडचा आंतरराष्ट्रीय टेनिसपटू रॉजर फेडररने यंदाचा पहिल्या ग्रॅंड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये बाजी मारली. या कामगिरीमुळे तो जगातील क्रमांक एकचा खेळाडू ठरला आहे. तसेच, जगातील सर्वाधीक वयस्कर टेनिसपटू ठरण्याचा मानही त्याला मिळाला आहे. ३६ वर्षीय फेडररने रोटरडम ओपनच्या क्वार्टरफायनलमध्ये हॉलंडच्या रॉबिन हासेला ४-६, ६-१, ६-१ अशा फरकाने पराभूत केले.
हायपरलूपने मुंबई पुण्याचे अंतर होणार कमी

हायपरलूपने मुंबई पुण्याचे अंतर होणार कमी

जगातील पहिली हायपरलूप मुंबई ते पुणेदरम्यान धावणार आहे. तसे झाल्यास दोन्ही शहरांतील १५० किमीचे अंतर फक्त १४ ते २५ मिनिटांत कापले जाणार आहे. सध्या हे अंतर गाठण्यासाठी तीन तास लागतात. रविवारी व्हर्जिन ग्रुप आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने मुंबई-पुणे हायपरलूप ट्रान्सपोर्टेशन सिस्टिमला जोडण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. 
‘माझ्या बायकोचा प्रियकर’चा टीझर प्रदर्शित

‘माझ्या बायकोचा प्रियकर’चा टीझर प्रदर्शित

अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव आणि भाग्यश्री मोटे यांची मुख्य भूमिका असलेला माझ्या बायकोचा प्रियकर सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या टीझरमध्ये तीनही व्यक्तिरेखांची छोटीशी झलक दाखवण्यात आली आहे. राजीव एस रूईया दिग्दर्शित आणि राजकला मूवीज व बाबा मोशन पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.