Short News

‘क्वॉर्टर’ या लघुपटाचा ट्रेलर झाला प्रदर्शित
<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/vVyJy-Y-WgQ" frameborder="0" allow="autoplay; encrypted-media" allowfullscreen></iframe>

‘क्वॉर्टर’ या लघुपटाचा ट्रेलर झाला प्रदर्शित

मराठी सिनेसृष्टीत आज खऱ्या अर्थाने क्रांती घडत आहे. नव्या दमाचे, नव्या विचारांनी भारलेले, नावीन्याचा ध्यास घेतलेले आजच्या पिढीतील तरूण दिग्दर्शक नावीन्यपूर्ण प्रयोग करत आहेत. कारण आता पर्यंत आपण फक्त सिनेमाच्या ट्रेलर आणि पोस्टर लॉन्चचे कार्यक्रम पाहत होतो. आता मराठी लघुपटाचे पोस्टर आणि ट्रेलर लॉन्च करण्यात आले आहे. ‘क्वॉर्टर असे या लघुपटाचे नाव आहे. 
व्लादीमिर पुतिन यांच्या विजयावर पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

व्लादीमिर पुतिन यांच्या विजयावर पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

रशियामध्ये व्लादिमीर पुतिन यांची परत सत्ता आली आहे. पुतिन चौथ्यावेळेस राष्ट्रपती बनणार आहेत. त्याच्या विजयावर भारताचे पंतप्रधान मोदी यांनी फोनवरुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. रशियाशी भारत व्यापारासह शस्त्रे खरेदी केले आहेत. एक्झिट पोलनुसार पुतिन यांना 70 टक्के पेक्षा जास्त मत मिळणार असल्याचे दिसत आहे. 
सलमान खानच्या प्रेयसीसोबत वरुण करणार डान्स

सलमान खानच्या प्रेयसीसोबत वरुण करणार डान्स

कोरिओग्राफरपासून दिग्दर्शक झालेल्या रेमो डिसूझाचे एबीसीडी आणि ‘एबीसीडी २' हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगलेच गाजले. डान्सवर आधारित या दोन्ही चित्रपटांनी बॉलिवूडमध्ये एक नवीन ट्रेण्ड तयार केला. आता याच चित्रपटाचा तिसरा भाग सध्या जोरदार चर्चेत आहे. रेमोच्या या चित्रपटात अभिनेता वरुण धवन आणि कतरिना कैफ ही जोडी दिसणार आहे. 
दहावीचा समाजशास्त्राचा पेपर व्हॉटसअॅपवर व्हायरल, पोलिसात तक्रार

दहावीचा समाजशास्त्राचा पेपर व्हॉटसअॅपवर व्हायरल, पोलिसात तक्रार

दहावीच्या समाजशास्त्र विषयाची इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका फुटल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना कल्याण तालुक्यातील वरप गाव येथील सिक्रेड हार्ट शाळेमध्ये घडली. या शाळेतील विद्यार्थ्याला आज सकाळी साडेनऊ वाजता व्हॉटसअॅपवर समाजशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळाली आहे. याबाबात टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.