Short News

रणांगण चित्रपटाने तीन दिवसात जमवला 2 कोटींचा गल्ला

रणांगण चित्रपटाने तीन दिवसात जमवला 2 कोटींचा गल्ला

1 मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला सचिन पिळगांवकर आणि स्वप्नील जोशी यांच्या ''रणांगण'' चित्रपटाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. तब्बल 10 वर्षांनी पुन्हा सचिन-स्वप्नील ही जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र येत कमाल केली. राज्यातील 265 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या रंणागण चित्रपटाने अवघ्या 3 दिवसांतचे जवळ-जवळ 2.12 लाखांचा गल्ला बॉक्स ऑफिसवर जमवला. 
'भाजपने राज्यपालांचा वापर करून सत्ता बळकावणे यापुढे थांबवावे'

'भाजपने राज्यपालांचा वापर करून सत्ता बळकावणे यापुढे थांबवावे'

कर्नाटक विधानसभेतील घटना अपेक्षेनुसारच घडल्या आणि सत्ता बळकावण्याचे व्यर्थ प्रयत्न सोडून देणे भारतीय जनता पक्षाला भाग पडले. भाजपने राज्यपालांचा वापर करून सत्ता बळकावणे आता थांबवावे आणि जनादेशाचा विनम्रपणे आदर करावा, अशी खरमरीत टीका गोवा शिवसेनेच्या उपाध्यक्ष व प्रवक्या राखी प्रभुदेसाई नाईक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे. भाजप राज्यपालपदाचा गैरवापर करत सत्ता बळकावत असतो. 
टी20 लीग : मुंबईचा 11 धावांनी दणदणीत पराभव

टी20 लीग : मुंबईचा 11 धावांनी दणदणीत पराभव

मुंबईसाठी महत्त्वाचा असलेल्या सामन्यात हिट मॅनचा संघाचा दणदणीत पराभव झाला. या पराभवासह मुंबईच्या बाद फेरीत जाण्याची संधीही मुंबईने गमावली आहे. दिल्लीने दिलेल्या पराभवाचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाच्या नाकीनऊ लागले. दिल्लीच्या भेदक गोलंदाजीपुढे मुंबईचे नामी फलंदाजींनी नांगी टाकली. मुंबईचा पूर्ण संघ 163 धावांवर गारद झाला. कर्णधार रोहित शर्माही या सामन्यातही निराशाजनक फलंदाजी केली. 
तीन मुलींचा तलावात बुडून मृत्यू

तीन मुलींचा तलावात बुडून मृत्यू

पोहण्यासाठी तलावात उतरलेल्या 3 मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मच्छिन्नद्रनाथ चिंचोली गावात ही दुर्घटना घडली. सोमित्रा सातपुते (वय 12 वर्षे), संगीता रणमळे (वय 15 वर्षे) आणि जना रणमळे (वय 18 वर्षे) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलींची नावे आहेत. 6 मुली आज सकाळच्या सुमारास गावच्या परिसरातील तलावावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या.