सलमान खानच्या प्रेयसीने लग्नाविषयी केले मोठे विधान
मनोरंजन
- 2 month, 13 days ago
सलमान खानची प्रेयसी युलिया वंतूरने सलमानसोबतच्या लग्नाविषयी मोठे वक्तव्य केले आहे. दोन व्यक्ती प्रेमात असताता तेव्हा लग्न करणे गरजेचे नसते असे तिने म्हटले आहे. आपल्याला वेगळी ओळख निर्माण करायची आहे. फक्त सलमान खानची गर्लफ्रेंड इतकीच राहायला नको असे ती म्हणाली. रुमानियामध्ये आपली ओळख निर्माण झाल्यानंतर आता बॉलीवूडमध्ये आपल्याला ओळख निर्माण करायची असल्याचे तिने सांगितले.