Short News

किंग खान शाहरुखने शेअर केला दिलीप कुमारांसोबतचा फोटो

किंग खान शाहरुखने शेअर केला दिलीप कुमारांसोबतचा फोटो

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार खूप दिवसांपासून आजारी आहेत. ९५ वर्षांचे दिलीप कुमार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांचा मानलेला मुलगा शाहरुख खान त्यांच्या घरी गेला होता. या क्षणाचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोत शाहरुख खानने काळ्या रंगाचा शर्ट घातला आहे, तर दिलीप कुमार यांनी अंगावर शॉल ओढली आहे. फोटोत दिलीप कुमार यांची प्रकृती खूपच नाजूक दिसत आहे. 
रावळपिंडीतील गावाला दिले मलाला युसूफजाईचे नाव

रावळपिंडीतील गावाला दिले मलाला युसूफजाईचे नाव

पाकिस्तानच्या रावळपिंडी जिल्ह्यातील एका गावाला नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसूफजाईचे नाव देण्यात आले आहे. पाकिस्तानातील सामाजिक कार्यकर्ते बशीर अहमद यांनी ट्विटरवरुन या संदर्भातील माहिती दिली. २०१२ मध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मलाला थोडक्यात बचावली होती. या नंतर ती परदेशात स्थलांतरित झाली होती. २०१४ साली वयाच्या सतराव्या वर्षी मलाला हिला नोबेल पारितोषिक मिळाले होते.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव

काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधी पक्ष सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव दाखल करणार आहेत. त्यासंदर्भात त्यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन नोटिस दिली आहे. शुक्रवारी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आपसांत चर्चा केल्यानंतर सरन्यायाधीशांच्या विरोधात महाभियोगाची नोटिस देण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले. घटनेतील कलम 270 आणि 124 अंतर्गत आम्ही ही नोटीस दिली आहे.
लग्नाला नकार दिल्याने 3 मुलींवर अॅसिड हल्ला

लग्नाला नकार दिल्याने 3 मुलींवर अॅसिड हल्ला

पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या एका भागात धक्कादायक घटना घडली आहे. केवळ लग्नाला नकार दिला या कारणामुळे तीन मुलींवर अॅसिड हल्ला करण्यात आला, अशी माहिती स्थानिक वृत्तसंस्थेने दिली आहे. या हल्ल्यात तिन्ही मुली जखमी झाल्या आहेत. पंजाब प्रांताच्या गुजरात जिल्ह्यातील दंग परिसरात ही घटना घडली. या तीन मुलींपैकी दोन बहिणी आहेत तर एक त्यांची मैत्रिण आहे. याप्रकरणातील तीन आरोपींपैकी एकाला अटक झाली आहे.