Short News

सनी लिओनीच्या बायोपिकच्या नावातून ‘कौर’ शब्द वगळा!

सनी लिओनीच्या बायोपिकच्या नावातून ‘कौर’ शब्द वगळा!

सनी लिओनीच्या बायोपिकचा ट्रेलर रिलीज होतो ना होतो, तोच यावरून वाद सुरू झाला आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे प्रवक्ता दिलजीत सिंह बेदी यांनी सनीच्या बायोपिकच्या नावावर आक्षेप नोंदवला आहे. या शीर्षकातील करणजीत कौर नावावर त्यांचा प्रमुख आक्षेप आहे. या बायोपिकचे नाव ‘करणजीत कौर' ठेवणे शिखांच्या भावानांशी खेळण्याचा प्रकार आहे. 
मलिष्कानंतर 'या' मराठी कलाकारांनी बनवली खड्ड्यांवर कविता

मलिष्कानंतर 'या' मराठी कलाकारांनी बनवली खड्ड्यांवर कविता

दोन दिवसापूर्वी आर जे मलिष्काचं खड्यांवरील गाणे व्हायरल झालं. या पाठोपाठ आता मराठी कलाकार देखील उतरले आहे. निर्माते - दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर एक व्हिडिओ टाकला आहे. या व्हिडिओ त्यांनी खड्ड्यांवर कविता केली आहे. त्यांच्यासह अभिनेत्री भार्गवी चिरमुले आणि स्मिता शेवळे आणि ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे देखील या व्हिडिओत आहेत. खड्डेच खड्डे असे या कवितेचे बोल आहेत. 
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा विषयच संपवूच टाकतो : पाटील

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा विषयच संपवूच टाकतो : पाटील

मुंबई- गोवा महामार्गावरील खड्डे आणि पुलांच्या दुरुस्तीचे काम 15 ऑगस्टपर्यंत कार असे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी संबंधित प्रशासनाला दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना चंद्रकात पाटील ही माहिती दिली. पुढील पावसाळी अधिवेशनात मुंबई-गोवा महामार्गाचा विषय पुन्हा येणार नाही, त्याआधीच काम पुर्ण करु असे पाटील म्हणाले. 
पतीचा मुख मैथुनासाठी हट्ट, पत्नीची सर्वोच्च न्यायालयात धाव

पतीचा मुख मैथुनासाठी हट्ट, पत्नीची सर्वोच्च न्यायालयात धाव

एका महिलेने आपल्या पतीविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. पती मुख मैथुनासाठी (Oral Sex)जबरदस्ती करत असल्याचा आरोप तिने केला आहे. मुख मैथुन अनैसर्गिक आहे, त्यामुळे त्यासाठी दबाव टाकणे गैर आहे असेही तिने आपल्या याचिकेत म्हटले आहे. महिलेच्या याचिकेवर सुनावणी करत जस्टिस एन.व्ही रामना आणि एम. एम. शांतनागौदर यांनी या महिलेच्या पतीला नोटीस जारी केली आहे. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more